ओंकार पाटीलच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून भरपाईचा आदेश
10:58 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : दोन दिवसांपूर्वी मार्कंडेय नदीत वाहून गेलेल्या अलतगा येथील ओंकार अरुण पाटील (वय 24) या तरुणाच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाच लाखाच्या भरपाईचे आदेशपत्र दिले आहे. सोमवारी पूरग्रस्त गोकाक व चिकोडी तालुक्याचा दौरा आटोपून बेळगावला परतल्यानंतर सांबरा विमानतळावर ओंकारच्या आईची भेट घ ऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना भरपाई मंजूर केल्यासंबंधीचे पत्र दिले. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या. यावेळी ओंकारची आई सुरेखा पाटील, वडील अरुण पाटील, भाऊ कार्तिक आदी विमानतळावर उपस्थित होते.
Advertisement
Advertisement