मोदींच्या सभेमुळे दोन्ही जागा विजयी होणार! मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींच्या सभेच्या तयारीची पहाणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधानांची जाहीर सभा तपोवन मैदानावर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोल्हापूर दौरा जाहीर झाल्यापासून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी महायुतीच्या नेत्यांनी जय्यत तयारी केली असून ही सभा ऐतिहासिक होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सभेसाठी महाराष्ट्रातील महायुतीचे अनेक नेते हजर राहणार असून स्वता मुख्यमंत्री काल रात्री कोल्हापूरात दाखल झाले त्यांनी तपोवन येथिल सभेच्या ठिकाणी भेट देऊन सभेच्या पुर्वतयारीची पहाणी केली.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी जोरात सुरू आहे.ही सभा विक्रमी होणार असून उद्या मतदार आणि मोदींचे चाहते मोठ्या संख्येने सभेला येणार आहेत. संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचे चांगले वातावरण आहे. मतदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये महायुतीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजना आणि घेतलेले निर्णय सुरू केलेले प्रकल्प या सर्व लोकाभिमुख आहेत. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहोत. जनतेने सुद्धा फिर एक बार मोदी सरकार असं ठरवलं आहे."अस त्यांनी म्हटलं आहे.
शेवटी बोलताना त्यांनी, "महायुतीला मेजॉरिटी सीट्स मिळतील. आमच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत विजयाची खात्री आहे. कोल्हापूर हे एक ऐतिहासिक शहर आहे इथे मोदी साहेबांची सभा होत आहे त्यामुळे त्यांना ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत." अशी प्रतिक्रिया दिली.