For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री, राज्यपालांना ‘अयोध्ये’चे निमंत्रण नाही?

06:37 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्री  राज्यपालांना ‘अयोध्ये’चे निमंत्रण नाही
Advertisement

गर्दीमध्ये सुरक्षा प्रोटोकॉलची समस्या निर्माण होण्याच्या शक्यतेने सावधगिरी

Advertisement

वृत्तसंस्था/ अयोध्या

22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले जाणार नसल्याचे समजते. याचे कारणही स्पष्ट करण्यात आले आहे. रामलल्लाच्या अभिषेक प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक अयोध्येला पोहोचण्याची शक्मयता आहे. अशा परिस्थितीत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी संबंधित प्रोटोकॉलचे पालन करणे शक्मय होणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव, देशभरातील राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. यजमान राज्य असल्याने, केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होतील.

Advertisement

रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत होणार आहे. रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेत सहभागी होण्यासाठी लोकांना निमंत्रण पाठवण्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्या आली आहे. एकूण 7 हजार लोकांना निमंत्रणे पाठवले जाणार असून त्यापैकी 3 हजार व्हीव्हीआयपी असतील. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह 3 हजार व्हीव्हीआयपींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या यादीत क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अभिनेता अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, कंगना राणावत यांचीही नावे आहेत. याशिवाय देशभरातून 4000 संत-मुनींना पाचारण करण्यात येणार आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. या सोहळ्याला आता महिनाही उरलेला नाही. कार्यक्रम दिमाखदार करण्यासाठी सरकार आणि न्यासाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या सोहळ्यादरम्यान सुरक्षा लक्षात घेऊन केवळ निवडक अतिमहनीय व्यक्तींनाच मुख्य सोहळ्यावेळी कार्यक्रमस्थळी हजर राहण्यासाठी निमंत्रणे पाठविली जात आहे. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोक अयोध्येत येणार आहेत, अशा परिस्थितीत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निर्धारित प्रोटोकॉल पाळणे शक्मय होणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. हे पाहता मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निमंत्रण पाठवले जाणार नाही.

पंतप्रधान 30 डिसेंबरला अयोध्यानगरीत

30 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचून श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळासह अयोध्या धाम रेल्वेस्थानकाचे उद्घाटन करतील. याचवेळी वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेसलाही ते हिरवा झेंडा दाखवतील. अभिषेक होण्याच्या अवघ्या 22 दिवस आधी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: अयोध्येतील श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ जानेवारी महिन्यापूर्वी कार्यान्वित होईल. अयोध्येहून दिल्ली आणि अहमदाबादसाठी पहिली उ•ाणे सुरू होणार आहेत. दिल्लीला जाण्यासाठी आठवड्यातून सात उ•ाणे असतील, तर अहमदाबादला जाण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा उपलब्ध असेल, अशी माहिती देण्यात आली. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ही पहिली अमृत भारत ट्रेन रामनगरी अयोध्येतून धावणार आहे. हे एक्स्प्रेस ताशी 130 किलोमीटर वेगाने धावताना दिसणार आहे. या एक्स्प्रेसमध्ये 22 बोगी असून त्यामध्ये सर्वसामान्य प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे.

Advertisement
Tags :

.