मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भाजप संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट
सावंतवाडी भाजप पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत
सावंतवाडी | प्रतिनिधी
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सावंतवाडी गवळी तिठा येथील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या भाजप संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत भाजपचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे ,माजी नगरसेवक आनंद नेवगी , माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी केले. यावेळी लोकसभा व विधानसभा निवडणुका आता होणार आहेत. त्या पक्षाची बांधणी करा आणि आपल्याला विजय हवा आहे. त्यासाठी काम करा असे त्यांनी कार्यकर्त्यांना सुचित केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ,मनोज नाईक ,विशाल माने ,दिलीप भालेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर ,विनोद सावंत, अजय सावंत, संदीप हळदणकर ,केतन आजगावकर, अमित परब ,गुरु मटकर, सुधाकर राणे आदी उपस्थित होते. यावेळी मुखमंत्र्यांनी संपर्क कार्यालयाची माहिती जाणून घेतली.