For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीला

12:50 PM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्री डॉ  प्रमोद सावंत दिल्लीला
Advertisement

मंत्रिमंडळ फेररचनेबाबत चर्चा करणार : डीजीपी सिंग यांच्याबाबतही निर्णय घेणार 

Advertisement

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आपल्या नियोजित दौऱ्यानुसार नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्याबाबत राजकीय क्षेत्रात बरीच चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री मंत्रिमंडळ फेर रचनेबाबत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. दिल्लीत काल मंगळवारी सायंकाळी त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची खासदार सदानंद तानावडे यांच्या समवेत भेट घेतली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार होते. राज्यातील मंत्रिमंडळ फेररचनेबाबत ते त्यांच्याशी चर्चा करून काही निर्णय घेणार आहेत. त्याचबरोबर पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांना गोव्यातून हटविण्यात यावे, अशी मागणीही ते करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबरच मडगावचे आमदार दिगंबर कामत व कुडचडेचे आमदार नीलेश काब्रालही दिल्लीत पोचले असल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.