महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गतिमान प्रशासनासाठी मुख्यमंत्री आक्रमक

04:32 PM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खात्यांच्या सचिवांना, अधिकाऱ्यांना दिल्या कानपिचक्या : जनतेच्या सर्व समस्या वेळेत सोडविण्याची सूचना

Advertisement

पणजी : जनतेची कामे खोळंब ण्याचे प्रकार नजरेस येत असल्याने यावर प्रतिबंध म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गतिमान प्रशासनासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात बेफिकीरी व कामचुकारपणा वाढल्याने मुख्यमंत्र्यांनी या घटनांची गंभीर दखल घेत आता खात्याच्या सचिवांना व अधिकाऱ्यांना जनतेच्या कामासंबंधी कानपिचक्या दिलेल्या आहेत. जनतेची सतावणूक न करता त्यांना दर्जेदार सेवा देण्याबरोबरच जनतेचे प्रश्न व समस्या वेळेत सोडविण्याची सूचना मुख्यमंत्री सावंत यांनी केली आहे. पर्वरी येथील मुख्यमंत्री कार्यालयात विविध खात्यांच्या सचिवांची व अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन या बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांनी काही अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बैठकीला सरकारी खात्यांचे सचिव, आयएएस व आयपीएस अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

बेजबाबदारपणा करता कामा नये 

विधानसभा अधिवेशनात बहुतांश आमदारांनी खात्यांतर्गत जनतेची कामे खोळंबली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. मुख्यमंत्र्यांनी याच गोष्टींची दखल घेत आता स्वत: अचानक सरकारी खात्यांना भेटी देण्याचाही धडाका लावला आहे. प्रशासनात काम करताना जनतेच्या कामाविषयी कोणत्याही प्रकारे बेजबाबदारपणा करता कामा नये, अशी सूचना मुख्यमंत्री सावंत यांनी विविध खात्याच्या सचिवांना व अधिकाऱ्यांना दिलेली आहे.

साधनसुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण करा 

जनतेला वेळेत सेवा देण्यासह साधनसुविधा प्रकल्पांचाही मुख्यमंत्री सावंत यांनी उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. साधनसुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करण्याची गरज आहे. नवनव्या पद्धतींचा अवलंब करून महसूल वाढविण्यावरही चर्चा झाली. केंद्र सरकारच्या योजनांची कार्यवाही कशा प्रकारे सुरू आहे, याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. जनतेला विनाविलंब सेवा मिळाव्यात यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री सावंत यांनी खाते सचिवांना दिलेले आहेत. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत प्रादेशिक कार्यालये बळकट करण्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

केंद्राच्या योजना सर्वांपर्यंत पोहचवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत देशातील जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत. या केंद्र सरकारच्या योजना गोव्यातील जनतेत सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी खाते सचिवांनी स्वत: कार्यतत्पर असायला हवे, अशी सूचना मुख्यमंत्री सावंत यांनी उच्चस्तरीय बैठकीत केली. प्रत्येक खात्याच्या कामाचा आढावा यापुढेही घेतला जाईल. प्रत्येकाने जनतेच्या कामाला प्रथम प्राधान्य देऊन विनाविलंब जनतेला सेवा देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वचक ठेवावा, असे त्यांनी खाते सचिवांना सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article