महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्यायाचा झेंडा फडकत राहिला पाहिजे!

06:22 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्व न्याय यंत्रणांनी जनतेचा विश्वास संपादन करावा : सरन्यायाधीशांचे प्रतिपादन

Advertisement

वृत्तसंस्था/ राजकोट

Advertisement

भारताचे सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड हे सपत्नीक दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी द्वारकाधीश मंदिरात श्रीकृष्णाची पूजा केली. या काळात मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. यानंतर सरन्यायाधीश राजकोटला पोहोचले. जामनगर रोडवर 110 कोटी ऊपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटन त्यांनी केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी न्यायाचा झेंडा सदैव फडकत राहिला पाहिजे, असे सांगत जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढविण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रबळपणे न्यायदानाचे कार्य करावे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि राज्याचे कायदा मंत्री हृषिकेश पटेल हेही उपस्थित होते.

आपल्या भाषणात सरन्यायाधीश म्हणाले की, मंदिरांच्या शिखरावरील झेंडे ज्या प्रकारे आपल्या सर्वांना एकत्र बांधतात. तसेच जिल्हा न्यायालयातील वकिलांनी येणाऱ्या पिढ्यांसाठी न्यायाचा झेंडा फडकत राहावा, अशा पद्धतीने काम करावे. मी महात्मा गांधींच्या जीवनातून आणि आदर्शांनी प्रेरित असल्याचा दाखलाही त्यांनी दिला. न्यायपालिकेसमोरील आव्हाने समजून घेण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी आपण विविध राज्यांना भेटी देण्यास सुऊवात केली असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले. दोन दिवसीय गुजरात दौरा हा त्याचाच एक भाग आहे. दौऱ्यादरम्यान मी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आणि जिल्हा न्यायालयाच्या अधिकाऱ्यांना भेटतो आणि त्यांच्या समस्या ऐकतो. अशा प्रकारे आपण न्यायव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यात सक्षम आहोत. याशिवाय, मी भारतीय न्यायव्यवस्थेचे यश सर्वांसोबत शेअर करण्यास सक्षम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकोटमध्ये नवीन हायटेक न्यायालय

आतापर्यंत राजकोटचे जुने न्यायालय तीन पॅम्पसमधील चार इमारतींमध्ये चालवले जात होते, परंतु आता 110 कोटी ऊपये खर्चून नवीन इमारत बांधण्यात आली आहे. यात 50 कोर्ट रूम आहेत. संपूर्ण पॅम्पस हायटेक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. नवीन न्यायालयाच्या इमारतीचे सरन्यायाधीशांनी खूप कौतुक केले आहे.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article