महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘दंगल’ चित्रपटातील छोटी बबिताचे निधन

06:22 AM Feb 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

19 व्या वषी सुहानी भटनागरने घेतला अखेरचा श्वास

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात छोटी बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे शनिवारी निधन झाले. 17 फेब्रुवारी रोजी दिल्लीत सुहानीने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या 19 व्या वषी सुहानीने या जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर दिल्लीच्या एम्स ऊग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या पार्थिवावर शनिवारीच फरिदाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपूर्वी सुहानी भटनागरच्या पायात फ्रॅक्चर झाले होते. त्यावरील उपचारासाठी घेत असलेल्या औषधांचा दुष्परिणाम (साईड इफेक्ट) तिच्यावर झाल्याची चर्चा आहे. औषध-गोळ्यांच्या रिअॅक्शनमुळे तिच्या शरीरात द्रव साचू लागला होता. हेच तिच्या मृत्यूचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुहानी भटनागरने 2016 मध्ये ‘दंगल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यामध्ये तिने आमिर खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. गीता आणि बबिता या दोन्ही बालकलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आमिर खान, साक्षी तन्वर आणि जायरा वसीमसोबत चित्रपटात काम केल्यानंतर सुहानीने काही टीव्ही जाहिरातींमध्येही काम केले. मात्र, नंतर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनयातून ब्र्रेक घेतला. ‘दंगल’फेम सुहानी भटनागर सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर खूप कमी फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. सुहानीने आपल्या दंगल सहकलाकारांसोबतचे अनेक फोटोही पोस्ट केले होते. तिची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट नोव्हेंबर 2021 मध्ये पडली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article