कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये आज शपथविधी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती

06:55 AM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान मोदींसह अनेक नेते राहणार उपस्थित

Advertisement

वृत्तसंस्था/ भोपाळ, रायपूर

Advertisement

भाजपने मध्यप्रदेश आणि छत्तीसगड पाठोपाठ राज्यस्थानच्या मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर केले आहे. मध्यप्रदेशात मोहन यादव हे विधिमंडळाचे नेते म्हणून निवडले गेले आहेत. तर छत्तीसगडमध्ये आदिवासी नेते विष्णुदेव साय यांना मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये बुधवारी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. यामुळे दोन्ही राज्यांमध्ये भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

मोहन यादव हे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतील. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री देखील शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळा भोपाळमधील लाल परेड मैदानात पार पडणार आहे. तर छत्तीसगडमध्ये शपथविधी सोहळ्यासाठी दुपारी 2 वाजताची वेळ निश्चित करण्यात आली आहे. विष्णुदेव साय हे मुख्यमंत्री पदाची तर दोन आमदार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. याचबरोबर 10 जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे मानले जात आहे.

मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश न•ा, तसेच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील या सोहळ्यात सामील होणार असल्याचे मानले जात आहे.

छत्तीसगडचे भावी मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, माजी उपमुख्यमंत्री टी.एस. सिंहदेव आणि छत्तीसगड काँग्रेस अध्यक्ष दीपक बैज यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. तर मध्यप्रदेशातील शपथविधी सोहळ्याकरता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्यासह अनेक नेत्यांना आमंत्रित केल्याचे समजते

Advertisement
Tags :
Chhattisgarh Madhya Pradesh Prime Minister Narendra MoDi presence
Next Article