छ.क्लस्टरच्या बुद्धिबळ-योगा स्पर्धा उत्साहात
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव व स्वाध्याय विद्या मंदिर स्कूल आयोजित छत्रपती शिवाजी क्लस्टर शहापूर, वडगाव, अनगोळच्या प्राथमिक विभागीय बुद्धिबळ व योगा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात डीपी संघाने वर्चस्व मिळविले आहे.ठळकवाडी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत मुलांच्या गटात वीर बिडीकर-हेरवाडकर, आर्णव चिंचणीकर-भारती विद्या भवन, गीतेश सागेकर- हेरवाडकर, अक्षय पवदाद-मुक्तांगण, श्रेयस आंबेवाडीकर-केएलएस यांनी विजेतेपद मिळविले. मुलींच्या गटात - वरा सय्यद, स्वरा देसाई, रिया लाडवा, लिजा मुल्ला, आरोही गुरव सर्व डीपी स्कूल यांनी विजेतेपद पटकाविले.
योगा स्पर्धेत मुलांच्या गटात - वादीराज खराटे-ठळकवाडी, अथर्व हलगेकर, निखील पारिश्वाड, सुरज पाटील व जोतिबा दिंडे सर्व संतमीरा स्कूल, तर नृत्य योगा स्पर्धेत सर्वज्ञ शिंदोळकर, श्रीनिधी सुतार, मुलींच्या गटात - तनिष्का उपाध्ये -डीपी, गायित्री मजुकर, मंदिरा नायक, झरा काझी, मानवी कुगजी सर्व संतमीरा तर नृत्यमध्ये साहित्या पाटील- डीपी व प्राची बी.-संतमीरा यांनी विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेश बेळगुंदकर, उमेश मजुकर, प्रवीण पाटील, जयसिंग धनाजी, रामलिंग परीट, राधा पुरी, सुजाता पिंगट यांनी काम पाहिले.