For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती

11:10 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती
Advertisement

ध. संभाजी चौकातील मूर्तीला जलाभिषेक-दुग्धाभिषेकासह विधिवत पूजन

Advertisement

बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने यावर्षीही हिंदू तिथीप्रमाणे ज्येष्ठ शुक्ल द्वादशी दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ध. संभाजी चौक येथील संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी, धारकरी उपस्थित होते. शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील व शहरप्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यापूर्वी संभाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला. शिवप्रतिष्ठानचे कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. पौरोहित्य प्रथमेश हुरकडली यांनी केले. यावेळी विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण, किरण बडवाण्णाचे, चंद्रशेखर चौगुले, शंकर भातकांडे, शिवाजी मंडोळकर, गजानन पवार, गजानन निलजकर, अमोल केसरकर, राम सुतार, सागर कडोलकर, अमित लगाडे, अंकुश केसरकर यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.