छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या समाधीस वज्रलेप
सातारा :
सातारा तालुक्यातील संगममाहुली येथे छत्रपती महाराणी ताराबाई यांची समाधी आहे. त्या समाधीस बज्रलेप व समाधीच्या डागडुजीचे काम श्री. स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठान यांच्यावतीने पूर्ण करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता समाधीस महाअभिषेक पुरोहितांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मावळा प्रतिष्ठानचे विनोद कुलकर्णी, तुषार महामुलकर, संगममाहुलीचे उपसरपंच अविनाश कोळपे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने, श्री. स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गौरवभाऊ घोडे आदी उपस्थित होते.
संगममाहुली येथे असलेल्या छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या समाधीबाबत अनेकदा चर्चा होत असतात. नुकतेच माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून समाधीबाबत डागडुजी करण्याची मागणी केली होती. समाधीकडे लक्ष द्यावे अशी विनंती करण्यात आली होती. असे असतानाच शुक्रवारी सकाळी श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानच्यावतीने छ. महाराणी ताराबाई यांच्या समाधीस बज्रलेप केल्याबद्दल महाअभिषेक करण्यात आला. याची माहिती ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने यांनी मीडियाला दिली. समाधीचे महत्वही त्यांनी सांगितले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गौरवभाऊ घोडे यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली.