छत्रपती क्लस्टर क्रीडा स्पर्धा 24 जुलै पासून
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते मान्यता प्राप्त स्वाध्याय विद्या मंदिर स्कुल आयोजित शहापुर, टिळकवाडी, अनगोळ छत्रपती शिवाजी क्लस्टर क्रीडा स्पर्धा 24 जुलै पासुन प्रारंभ होणार आहे. स्वाध्याय विद्या मंदिरच्या सभागृहात बैठक आयोजित केले होती. या क्रीडा स्पर्धेच्या बैठकी प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पीइओ जे बी पटेल, हनुमंत मस्तीहोळी, बापू देसाई, स्वाध्याय विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका हेमलता हिरेमठ, टिळकवाडी विभागाच्या शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सिल्वीया डिलिमा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शहापूर, टिळकवाडी, अनगोळ विभागातील छत्रपती शिवाजी क्लस्टर क्रीडा स्पर्धेच्या वेळापत्रक बाबत पीइओ जी बी पटेल यांनी माहिती दिली. यावेळी उमेश बेळगुंदकर, प्रवीण पाटील, रामलिंग परीट, उमेश मजुकर, सुनिता जाधव, अर्जुन भेकणे आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
या स्पर्धेच्या वेळापत्रक पुढीलप्रमाणे, 28 जुलै रोजी योगसन व बुद्धिबळ स्पर्धा स्थळ स्वाध्याय विद्यामंदीर, 31 जुलै रोजी कराटे स्पर्धा स्थळ केएलएस, 21 ऑगस्ट रोजी टेबल टेनिस स्थळ केएलएस, 8 ऑगस्ट रोजी कबड्डी स्थळ भंडारी, 9 ऑगस्ट रोजी शटल बॅडमिंटन ओरिएंटल स्कूल, 07 ऑगस्ट रोजी हॉकी स्थळ लेले मैदान, 16 ऑगस्ट रोजी बास्केटबॉल डी.पी. शाळा, 20 ऑगस्ट रोजी खो-खो स्थळ केएलएस, 20 ऑगस्ट रोजी हँडबॉल केएलएसए, 25 ऑगस्ट रोजी व्हॉलीबॉल स्वाध्याय विद्यामंदीर 25 ऑगस्ट रोजी थ्dरोबॉल बालिका आदर्श, 13 ऑगस्ट रोजी फुटबॉल लेले मैदान, अॅथलेटिक्स प्रवेश यादी - 21 ऑगस्ट रोजी आरपीडी मैदानावर घेतले जानार आहे.