महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहर परिसरात भक्तीभावाने छठ पूजा

11:30 AM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्तर भारतीय नागरिकांकडून आचरण

Advertisement

बेळगाव : उत्तर भारतीयांच्यावतीने बेळगावमध्ये छठ पूजा करण्यात आली. सह्याद्रीनगर, कंग्राळी तसेच वडगाव परिसरात उत्तरप्रदेश व बिहारमधील नागरिकांनी गुरुवारी व शुक्रवारी नदी तसेच तलावांच्या किनाऱ्यावर छठ पूजा केली. देशाच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात छठ पूजा केली जाते. छठ पूजेदरम्यान गावी जाता न आल्याने मागील काही वर्षांपासून बेळगावमध्येच छठ पूजा केली जात आहे. बेळगाव परिसरात अनेक व्यवसाय, उद्योगांमध्ये युपी-बिहारमधील नागरिक कार्यरत आहेत. या नागरिकांकडून छठ पूजेचे आयोजन केले जाते. गुरुवारी सायंकाळी तसेच शुक्रवारी सकाळी पूजन करून या कार्यक्रमाची सांगता झाली. पाण्यामध्ये विशिष्ट प्रकारची आरास करून ही पूजा केली जाते. सह्याद्रीनगर तसेच कंग्राळीजवळील नदीमध्ये पूजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article