कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘छावा’ चित्रपट 31 मेपर्यंत करमुक्त

10:47 AM Feb 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वित्त खात्याकडून आदेश जारी

Advertisement

पणजी : ‘छावा’ हा हिंदी चित्रपट गोवा राज्यात करमुक्त करुन दाखवण्याचा आदेश वित्त खात्याने जारी केला असून तो 21 फेब्रुवारी ते 31 मे या कालावधीसाठी करमुक्त राहाणार आहे, असे आदेशात नमूद केले आहे. गोव्यातील थिएटर मालकांना राज्य सरकारतर्फे गुडस आणि सर्व्हिस टॅक्सची  (एसजी - एसटी) भरपाई करण्यात येणार आहे. जनहित लक्षात घेऊन हा चित्रपट करमुक्त करण्यात आला असून तो सर्वांना पाहता यावा म्हणून सर्व थिएटर्समध्ये त्याचे प्रदर्शन करावे अशी सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एकंदरित जनतेला तसेच विद्यार्थी, तरुण पिढीला इतिहासाचे ज्ञान व्हावे आणि ते वाढावे म्हणून हा प्रयत्न करण्यात आला आहे.  एसजी-एसटी हा कर तिकीटातून वगळावा आणि तो थिएटर मालकांनी भरावा नंतर त्याचा परतावा सरकारतर्फे देण्यात येणार असून त्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या असल्याचे आदेशात नमूद केले आहे. सध्या या चित्रपटास सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून गोव्यातील प्रेक्षकांनाही त्याचा लाभ व्हावा म्हणून तो करमुक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांवर तो चित्रपट आधारित असून सदर कर भरपाईचा लाभ उपरोक्त कालावधीसाठीच मिळणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article