कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विषाणूंपासून वाचविणारा च्युइंग गम

06:39 AM May 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

95 टक्क्यांपर्यंत कमी होणार विषाणू संक्रमणाचा धोका

Advertisement

इन्फ्लुएंजा (फ्लू) आणि हर्पीज व्हायरसमुळे दरवर्षी लाखो लोक संक्रमणाचे शिकार ठरतात. जागतिक स्तरावर मौसमी इन्फ्लुएंजा दरवर्षी सुमारे 1 अब्ज लोकांना संक्रमित करतो, यामुळे सुमारे 6.50 लाख लोकांचा श्वसनसंबंधी जटिलतांमुळे मृत्यू होतो.

Advertisement

65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये फ्ल्यू गंभीर रुप धारण करणे आणि यामुळे जीवाला धोका होण्याचे प्रमाण अधिक असते. अशाचप्रकारे हर्पीज संक्रमणामुळे दरवर्षी लाखो लोक संक्रमित होत असतात. परंतु आता अशाप्रकारच्या संक्रमणावरून अधिक चिंता करण्याची गरज नाही. अमेरिकेतील पेन्सिलवेनिया विद्यापीठाच्या संशोधकांच्या टीमने एक विशेष प्रकारचा च्युइंग गम विकसित केला असुन तो हर्पीज आणि फ्ल्यू विषाणूच्या प्रसाराला कमी करण्यास मदत करू शकतो. या गमच्या परीक्षणात तो या व्हायरल इन्फेक्शनच्या लोडला 95 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो, असे आढळून आले आहे.

विषाणूपासून मिळणार सुरक्षा

वैज्ञानिकांच्या या संशोधनाला मोठे यश मानले जात आहे, हे संशोधन व्हायरल इन्फेक्शन रोखण्याच्या पद्धतीला नवा आकार देऊ शकते. केवळ च्युइंग गम चघळून संक्रमणाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करता येणार आहे. हर्पीज सिम्प्लेक्स व्हायरस (एचएसव्ही-1 आणि एचएसव्ही-2) आणि इन्फ्लुएंजा-ए-स्ट्रेन (एच1एन1 आणि एच3एन2) दोन्हींच्या व्हायरल लोडला कमी करण्यास या च्युइंग गमची मदत होऊ शकते. दरवर्षी ऋतू बदलण्यासोबत इन्फ्लुएंजाचे रुग्ण वेगाने वाढत असतात. व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी आरोग्य तज्ञ सर्व लोकांना वार्षिक इन्फ्लुएंजा व्हॅक्सिन घेण्याचा सल्ला देतात, परंतु मर्यादित लसीकरणामुळे मोठ्या प्रमाणात लोक व्हॅक्सिनेशनपासून वंचित राहतात. तर हर्पीज संक्रमणापासून वाचण्यासाठी कुठलीच लस नाही.

च्युइंग गमची निर्मिती प्रक्रिया

इन्फ्लुएंजा मुख्यत्वे श्वसन संक्रमण आहे, तर हर्पीज सिम्प्लेक्स व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने फैलावतो. व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी वैज्ञानिकांच्या टीमने अशी पद्धत शोधण्यावर लक्ष केंद्रीत पेले, ज्याद्वारे दोन्ही व्हायरस सर्वाधिक फैलावतात. वैज्ञानिकांनी लॅबलीब बीन्स ज्याला लॅबलॅब पर्पुरियस या नावाने ओळखले जाते, त्याचा वापर करत च्युइंग गम तयार केला, यात स्वाभाविक स्वरुपात फ्रिल नावाचा एक विशेष प्रोटीन असतो. हा प्रोटीन व्हायरसला वाढण्यापासून रोखतो आणि निष्प्रभ करण्यास मदत करू शकतो.

कसा पडणार याचा प्रभाव

जेव्हा या गमला चघळाल, तेव्हा यातून सातत्याने अँटीव्हायरल प्रोटीन रिलीज होत राहील, जे व्हायरसला शरीरात वाढण्यापूर्वीच निष्प्रभ करणार आहे. लॅबमध्ये दोन ग्रॅमचा एक च्युइंग गम व्हायरल संक्रमणाच्या जोखिमीला 95 टक्क्यापर्यंत कमी करण्यास उपयुक्त आढळून आला आहे. हे मानवी वापरासाठी अत्यंत सुरक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. याचे परिणाम आशाजनक आहेत, सध्या याचे मानवी व्यापक परीक्षण केले जाणार असून यातून प्रभाविकतेचे अधिक चांगल्याप्रकारे आकलन करता येईल असे उद्गार पेन स्कूल ऑफ डेंटल मेडिसीनचे प्राध्यापक हेन्री डॅनियल यांनी काढले आहेत.

बर्ड फ्लू रोखण्यासाठीही प्रयत्न

पुढील टप्प्यांमध्ये वैज्ञानिकांची टीम हा गम एवियन इन्फ्लुएंजा किंवा बर्ड फ्ल्यू रोखण्यास कशाप्रकारे मदत करू शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हायरसचा प्रसार नियंत्रित करणे अद्याप जगभरासाठी एक मोठे आव्हान आहे. बीन पावडर सारख्या नैसर्गिक खाद्य उत्पादनांचा वापर करणे स्मार्ट पद्धत आहे, असे प्राध्यापक डॅनियल यांनी सांगितले आहे. तर हा च्युइंग गम कधी उपलब्ध होईल याची माहिती देण्यात आलेली नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article