तंबाखू खाल तर 200 रुपये दंड भराल !
कोल्हापूर :
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समन्वय समितीच्या वतीने आजपासून तंबाखू विरोधी मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणासह शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयाच्या आवारात तंबाखूचे सेवन करताना आढळल्यास जाग्यावर 200 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. शासकीय कर्मचारी आढळल्यास दुप्पट दंडाची रक्कम वसुल केली जाणार आहे.
या मोहिमेत शासकीय कार्यालयातील आस्थापणांचे प्रमुख कारवाई करणार आहेत. कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सक्त सूचना दिल्या असुन कारवाईची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ही मोहिम तीव्र करण्यात येणार आहे. एखादा व्यक्ती थुंकताना आढळल्यास तपासणी करून दंड वसूल केला जाईल.
प्रत्येक शासकीय कार्यालयातील आस्थापनाविषयक कामकाज पाहणारे प्रमुख अधिकारी, कर्मचारी तंबाखू नियंत्रणाचे कामकाज पाहणार आहेत. या मोहिमेत ‘दंड अधिकारी’ म्हणून ओळखले जाणार आहे. शाळा-महाविद्यालय, शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. एखादा नागरिक थुंकताना अथवा तंबाखूचे सेवन करताना आढळल्यास 200 रूपये दंड वसुल केला जाणार आहे. तर शासकीय कार्मचारी आढळल्यास 400 रूपये दंड वसूल केला जाणार आहे.
यासाठी जिह्यातील सर्व शासकीय कार्यालयासह महाविद्यालयांमध्येही दंडाच्या पावती पुस्तिकांचे वितरण केले आहे. शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांना या दंडात्मक कारवाईबाबत उद्दिष्ट नेमून दिले आहे. जिह्यात विशेष मोहीम राबवून, सर्व शाळा, शासकीय कार्यालये आणि महाविद्यालयांमध्ये संबंधित आस्थापनांचे प्रमुख आणि दंड अधिकारी यांनी तपासणी करून दंडात्मक कारवाई करणार आहेत.
- आशा कर्मचाऱ्यांचा मोहिमेत सहभाग
जिल्हा स्तरावर प्रत्येक गावात आशा कर्मचाऱ्यांनाही तंबाखू विरोधी मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहेत. त्यांना गावातील किमान एक पुरुष किंवा स्त्राr तंबाखूमुक्त करण्याचे उद्दिष्ट दिले जाणार आहे. त्याचबरोबर तंबाखूमुक्त कार्यालय मोहिम राबवली जाणार आहे.
- गुटखा, मावा विक्रीवर कारवाई आवश्यक
शहरासह उपनगरातील चौका-चौकातील सर्वच पान टपऱ्यांमध्ये मावा, गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. काही ठिकाणी तर मावा खरेदीसाठी झुंबड उडालेली असते. याकडे मात्र, जाणुनबूजुन कानाडोळा होत असुन यामागे आर्थिक ताडजोड असल्याचे बोलले जात आहे. सेवनावर बंदी आणण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी विक्री करणाऱ्यांवरही कडक कारवाई करणे गरजचे आहे.
- शाळा परिसरात तीव्र मोहिम
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक, पालक आणि विद्यार्थी जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन किंवा विक्रीस प्रतिबंध नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
-जिल्ह्यातील समुदेदशन केंद्रे : 14
-एप्रिल ते मे महिन्यातील नोंदणी रूग्ण : 1108
-तंबाखूमुक्त झालेले : 109
-कॅन्सरग्रत आढळलेले : 3
-दंडात्मक कारवाई : 124
-आरोग्य विभग दंड वसूल : 5340
-पोलिसांकडून दंड वसूल : 20 हजार रुपये
r