कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बुद्धिबळ विश्वचषक : टायब्रेकरमध्ये हरिकृष्णचे आव्हान संपुष्टात

06:50 AM Nov 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ पणजी

Advertisement

गोव्यात चालू असलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या रविवारी झालेल्या पाचव्या फेरीच्या टायब्रेकरमध्ये मेक्सिकोच्या जोस एदुआर्दो मार्टिनेझ अलकांतराकडून पराभव पत्करावा लागल्याने भारतीय ग्रँडमास्टर पेंटाला हरिकृष्ण स्पर्धेबाहेर पडला आहे. या निकालासह हरिकृष्ण स्पर्धेतून बाहेर पडणारा 23 वा भारतीय खेळाडू बनला आहे. यामुळे स्पर्धेतील सर्वोच्च मानांकित खेळाडू अर्जुन एरिगेसी हा यजमान देशाचा एकमेव प्रतिनिधी रिंगणात राहिला आहे.

Advertisement

या पराभवापूर्वी हरिकृष्णने स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. अर्जुनसह पाचव्या फेरीत पोहोचणाऱ्या फक्त दोन भारतीयांपैकी तो एक होता. त्याच्या मोहिमेत दुसऱ्या फेरीत रशियन विजेता आर्सेनी नेस्टेरोव्ह, बेल्जियमचा डॅनियल दर्धा आणि स्वीडिश ग्रँडमास्टर निल्स ग्रँडेलियस यांच्यावरील विजयांचा समावेश होता.

जर हरिकृष्णने मार्टिनेझविऊद्ध विजय मिळवला असता, तर तो कँडिडेट स्पर्धेतील स्थान निश्चित करण्यापासून फक्त एक फेरी दूर राहिला असता. या विश्वचषकातील अव्वल तीन स्थान पटकावणारे खेळाडू सायप्रसमध्ये होणाऱ्या 2026 च्या कँडिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेतील विजेत्याला विद्यमान क्लासिकल वर्ल्ड चॅम्पियन भारताच्या डी. गुकेशला आव्हान देण्याचा अधिकार मिळेल.

स्पर्धेत राहिलेला शेवटचा भारतीय खेळाडू अर्जुन एरिगेसीला त्याच्या क्वार्टरफायनलमधील सामन्यात सातव्या मानांकित चीनच्या वेई यीविऊद्ध कठीण आव्हानाला सामोरे जावे लागेल. दुसरीकडे, जोस मार्टिनेझ त्याच्या क्वार्टरफायनल सामन्यात उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हशी लढेल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article