महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चेन्नईचा सलग दुसरा पराभव

06:58 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हैदराबाद सहा गड्यांनी विजयी   : सामनावीर अभिषेक शर्माच्या 12 चेंडूत 37 धावा

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा सहा गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 165 धावा केल्या. यानंतर हैदराबादने विजयी लक्ष्य 18.1 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यातच पूर्ण केले. मॅरक्रमचे शानदार अर्धशतक व ट्रेव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांनी फटकेबाजी करत हैदराबादच्या विजयात मोलाचे योगदान दिले. दरम्यान, चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. गुणतालिकेत चेन्नईचा संघ तिसऱ्या स्थानी असून हैदराबादचा संघ पाचव्या स्थानी आला आहे.

166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादला अभिषेक शर्मा व ट्रेव्हिस हेड यांनी तुफानी सुरुवात करून दिली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 17 चेंडूत 46 धावांची भागीदारी झाली. युवा सलामीवीर अभिषेक शर्माने क्रिजवर येताच चौकार आणि षटकारांची आतषबाजी सुरू केली. तो पहिल्या चेंडूपासून आक्रमणाच्या मोडमध्ये होता. अभिषेकने अवघ्या 12 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 37 धावांची शानदार खेळी केली. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 300 च्या वर राहिला. हेडने देखील 3 चौकार आणि 1 षटकाराच्या जोरावर 24 बॉलमध्ये 31 धावा फटकावल्या. ही भागीदारी दीपक चहरने तोडली. तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर चहरने अभिषेक शर्माला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. यानंतर आलेल्या मॅरक्रमने अर्धशतकी खेळी साकारली. त्याने 36 चेंडूत 50 धावांचे योगदान दिले. यानंतर मोईन अलीने 16 व्या षटकात शाहबाज अहमदला एलबीडब्ल्यू आऊट केले. शाहबाजने 19 चेंडूंत 18 धावा केल्या. मॅरक्रम व शाहबाद अहमद बाद झाल्यानंतर क्लासेन व नितीश रे•ाr यांनी संघाला विजय मिळवून दिला. हेनरिक क्लासेनने 11 चेंडूत 10 धावा करून नाबाद राहिला. तर नवा खेळाडू नितीश रे•ाr 8 चेंडूत नाबाद 14 धावा केल्या.

चेन्नईचा सलग दुसरा पराभव

या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी दिली. भुवनेश्वर कुमारने डावातील चौथ्या षटकात सलामीच्या रचिन रविंद्रला झेलबाद केले. त्याने 9 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. कर्णधार गायकवाड आणि अजिंक्य रहाणे यांनी दुसऱ्या गड्यासाठी 29 धावांची भर घातली. शहबाज अहमदने गायकवाडला समादकरवी झेलबाद केले. त्याने 21 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 26 धावा जमविल्या. अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे या जोडीने मात्र संघाला सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न केला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 6.3 षटकात 65 धावांची भागीदारी केली. कमिन्सच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात दुबे भुवनेश्वर कुमारकरवी झेलबाद झाला. त्याने 24 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारासह 45 धावा केल्या. उनादकटने रहाणेला झेलबाद केले. त्याने 30 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 35 धावा जमविल्या. रविंद्र जडेजा आणि मिचेल या जोडीला शेवटच्या दोन षटकामध्ये हैदराबादच्या गोलंदाजानी फटकेबाजीपासून रोखण्यात यश मिळविल्याने चेन्नईला मोठी धावसंख्या रचता आली नाही. नटराजनने मिचेलला झेलबाद केले. त्याने 13 धावा जमविल्या. धोनीला केवळ 2 चेंडू खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने नाबाद 1 धाव केली. रविंद्र जडेजाने 23 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 31 धावा झळकविल्या. चेन्नईच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक गाठता आले नाही. चेन्नईला निर्धारित 20 षटकांत 5 बाद 165 धावापर्यंत मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपर किंग्ज 20 षटकात 5 बाद 165 (रचिन रविंद्र 12, गायकवाड 26, अजिंक्य रहाणे 35, शिवम दुबे 45, रविंद्र जडेजा नाबाद 31, मिचेल 13, धोनी नाबाद 1, अवांतर 2, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, कमिन्स, शहबाज अहमद, उनादकट प्रत्येकी 1 बळी).

सनरायजर्स हैदराबाद 18.1 षटकांत 4 बाद 166 (ट्रेव्हिस हेड 31, अभिषेक शर्मा 37, मॅरक्रम 50, क्लासेन नाबाद 10, नितीश कुमार रे•ाr नाबाद 14, मोईन अली दोन बळी, थिक्षण व चहर प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article