कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चेन्नईची पराभवाची मालिका कायम

06:57 AM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सीएसकेचा आयपीएलमधील सातवा पराभव : हैदराबादचा 5 गड्यांनी विजय :  हर्षल पटेलचे 4 बळी 

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

महेंद्रसिंग धोनी आपल्या 400 व्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण धोनी या सामन्यात फलंदाजी आणि नेतृत्वात पुरता अपयशी ठरला आणि सीएसेकला पराभवाचा धक्का बसला. चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करताना 154 धावांत ऑल आऊट झाला. यानंतर हैदराबादने हे विजयी आव्हान 18.4 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. चेन्नईचा हा या आयपीएलमधील सातवा पराभव ठरला असून त्यांचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. दुसरीकडे, हैदराबादचा हा तिसरा विजय ठरला आहे.

घरच्या मैदानावर चेन्नईची सुरुवात खराब झाली. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात शेख रशीदला आऊट करून पहिला झटका दिला. रशीदला भोपळाही फोडता आला नाही. तिसऱ्या क्रमांकावर आलेला सॅम करनही फार काही करू शकला नाही आणि 10 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. पण, आयुष म्हात्रेने पुन्हा एकदा स्फोटक शैलीत फलंदाजी करताना 6 चौकारांसह 30 धावांचे योगदान दिले. पॉवरप्लेनंतर चेन्नई सुपर किंग्जचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी अनुभवी रवींद्र जडेजा आणि डेवाल्ड ब्रेव्हिसवर आली. दोघांनीही 24 चेंडूत 27 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी जमलेली असताना 21 धावा काढल्यानंतर जडेजा बोल्ड झाला.

ब्रेव्हिसने सीएसकेसाठी पदार्पणाच्या सामन्यात काही स्फोटक शॉट मारले, पण नंतर त्याचा कामिंदू मेंडिसने एक चांगला कॅच घेतला. ब्रेव्हिस 35 चेंडूत एका चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 42 धावा करून आऊट झाला. यानंतर, शिवम दुबे 12 धावा करून त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. दीपक हुडाने 22 धावांचे योगदान दिलश. इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केल्यामुळे चेन्नईचा डाव 19.5 षटकांत 154 धावांत ऑलआऊट झाला. हैदराबादकडून हर्षल पटेलने शानदार गोलंदाजी करताना 4 बळी घेतले.

हैदराबादचा शानदार विजय

चेन्नईने हैदराबादला विजयासाठी 155 धावांचे सोपे आव्हान ठेवले होते. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अभिषेक शर्माला शून्यावर बाद केले. इशान किशनने 44 धावांची खेळी साकारली खरी, पण त्याला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. ट्रेव्हिस हेड, हेन्रीच क्लासिन यावेळी मोठी फटकेबाजी करू शकले नाही. हेडने 19 तर क्लासेननला 7 धावा करता आल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा कामिंडू मेंडिस संघाच्या मदतीला धावून आला. मेंडिसने सर्वाधिक 3 चौकारासह नाबाद 32 धावा करत हैदराबादला 18.4 षटकांतच विजय मिळवून दिला. त्याला नितीश कुमार रे•ने नाबाद 19 धावा करत चांगली साथ दिली. सीएसकेकडून नूर अहमदने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग्स 19.5 षटकांत सर्वबाद 154 (आयुष म्हात्रे 30, रविंद्र जडेजा 21, ब्रेविस 42, दीपक हुडा 22, हर्षल पटेल 28 धावांत 4 बळी, पॅट कमिन्स, उनादकट प्रत्येकी दोन बळी, मोहम्मद शमी 1 बळी)

सनरायजर्स हैदराबाद 18.4 षटकांत 5 बाद 155 (अभिषेक शर्मा 0, ट्रेव्हिस हेड 19, इशान किशन 44, अनिकेत वर्मा 19, कमिंदू मेंडिस नाबाद 32, नितिश कुमार रे•ाr नाबाद 19, नूर अहमद 2 बळी, खलील अहमद, अंशूल कंबोज व रविंद्र जडेजा प्रत्येकी एक बळी).

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article