For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नईचा मुकाबला आज मुंबईशी

06:55 AM Apr 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
चेन्नईचा मुकाबला आज मुंबईशी
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

मुंबई इंडियन्सची गाठ आज रविवारी होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सशी पडणार असून विजयी घोडदौडीला कायम ठेवण्याच्या दृष्टीने रणनीती बदलण्याचे आव्हान मुंबईसमोर असेल. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादवर सलग दोन विजय मिळवून त्यांच्या डळमळीत मोहिमेला पुन्हा जिवंत करताना चांगली कामगिरी केली आहे. परंतु हार्दिक पंड्याच्या सातव्या स्थानावर असलेल्या संघाला गुणतालिकेत बढती मिळविण्यासाठी बराच रेटा लावावा लागेल.

Advertisement

मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवरील मागील सामन्यात हैदराबादच्या स्फोटक फलंदाजीला अचूक रणतीनी वापरून रोखले. परंतु जबरदस्त फिरकी मारा असलेल्या सीएसकेविऊद्ध तसा दृष्टिकोन यशस्वी होईलच याची हमी नाही. चेन्नईच्या नूर अहमदने 12 बळी घेत सीएसकेतर्फे चांगली कामगिरी केली आहे. त्याशिवाय पाच वेळच्या विजेत्या या संघाकडे रविचंद्रन अश्विन (5 बळी) आणि रवींद्र जडेजा (4 बळी) हे दोन अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत.

मुंबईतर्फे रोहित शर्माने अद्याप मोठी धावसंख्या उभारलेली नाही, परंतु हैदराबादविरुद्धच्या त्याच्या वेगवान सुऊवातीमुळे मुंबईला आवश्यक असलेली प्रेरणा मिळाली. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनीही चांगली कामगिरी केली आहे. रायन रिकल्टनने अव्वल स्थानावर योगदान दिल्याने आणि विल जॅक्सच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबईला आवश्यक चालना मिळाली आहे. ट्रेंट बोल्टने अलीकडील सामन्यांमध्ये यॉर्कर्सचा अचूक मारा केल्याने आणि जसप्रीत बुमराहला देखील लय सापडल्याने संघ व्यवस्थापन आनंदात असेल.

हार्दिक पंड्याने गोलंदाज आणि फलंदाज म्हणून त्याची भूमिका चांगल्या प्रकारे बजावली आहे. पण शेवटच्या षटकांत आक्रमक फलंदाजीसाठी ते नमन धीरवर अवलंबून असतील. हैदराबादविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना कर्ण शर्माच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यातून सावरण्यासाठी फारसा वेळ मिळालेला नसल्याने तो आज खेळणार की नाही हे पाहावे लागेल. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सवर सीएसकेने पाच गड्यांनी विजय मिळविलेला असला, तरी त्यांच्या सलग चार पराभवांतून दिसून आलेला त्रासदायक क्रम मिटल्याचे दिसून आलेले नाही. चेन्नईच्या मोहिमेला पुनऊज्जीवित करण्यासाठी शेवटच्या षटकांतील फलंदाजीत एम. एस. धोनीला चांगले योगदान द्यावे लागेल. शिवाय गुडघ्याच्या दुखापतीचे व्यवस्थापन करण्याचे काम त्याला करावे लागणार आहे.

संघ-मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, श्रीजीथ कृष्णन, बेव्हन जेकब्स, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, मिशेल सँटनर, राज अंगद बावा, विघ्नेश पुथूर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, दीपक चाहर, अश्वनी कुमार, रीस टोपले, व्ही. एस. पेनमेत्सा, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, जसप्रीत बुमराह.

चेन्नई सुपर किंग्स : एम. एस. धोनी (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शेख रशीद, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, आयुष म्हात्रे, रचिन रवींद्र, रविचंद्रन अश्विन, विजय शंकर, सॅम करन, अंशुल कंबोज, दीपक हुडा, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, खलील अहमद, नूर अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, श्रेयस गोपाल, मथीशा पाथिराना.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.