For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नई संघाच्या सरावाला प्रारंभ

06:22 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
चेन्नई संघाच्या सरावाला प्रारंभ
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

2024 च्या आयपीएल स्पर्धेसाठी धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आपल्या सरावाला शनिवारी येथे प्रारंभ केला. चेन्नई संघातील खेळाडूंनी किमान 3 तास नेटमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजीचा सराव केला.

या सरावासाठी चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंची पहिली तुकडी शुक्रवारी येथे दाखल झाली. या संघातील सिमरजित सिंग, राजवर्धन हंगरगेकर, मुकेश चौधरी, प्रशांत सोळंकी, दीपक चहर यांनी बराच वेळ सराव केला. मध्यंतरी दुखापतीमुळे दीपक चहरला क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागले होते. गेल्या महिन्यात दीपक चहर पूर्ण तंदूरूस्त झाला असून त्याने बेंगळूरच्या क्रिकेट अकादमीमध्ये काही दिवस सराव केला. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या विवाहा प्रसंगी आयोजिलेल्या स्वागत समारंभामध्ये चेन्नईचा कर्णधार एम. एस. धोनी तसेच क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवर दाखल झाले आहेत. 22 मार्च रोजी आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होणार असून चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी यांच्यात सलामीचा सामना बेंगळूरमध्ये होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.