महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चेन्नई सुपर किंग्सची विजयी सलामी

06:59 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरसीबीवर 6 गडी राखून दणदणीत विजय : शिवम दुबे, रचिन रवींद्रची फटकेबाजी

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

आयपीएल 2024 चा उद्घाटनाचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. सलामीच्या या सामन्यातच सीएसकेने आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 6 गडी गमावत 173 धावांपर्यंत मजल मारली. सीएसकेसमोर विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी 8 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. सीएसकेच्या विजयाचा हिरो मुस्तफिजुर रहमान ठरला, त्याने 4 विकेट घेतल्या.

आरसीबीने दिलेल्या 174 धावांचा आव्हान पाठलाग करताना चेन्नईने आक्रमक सुरुवात केली. मात्र, कर्णधार ऋतुराज गायकवाडला आज मोठी धावसंख्या करु शकला नाही. तो 15 धावा करुन बाद झाला. युवा रचिन रविंद्रने फटकेबाजी करताना 15 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारासह 37 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडला यश दयाळने बाद केलं. तर रवींद्रला कर्ण शर्माने तंबूचा रस्ता दाखवला. अजिंक्य रहाणे आणि डॅरेल मिचेल चेन्नईचा डाव सावरणार असे वाटत असतानाच 27 धावा करुन रहाणे बाद झाला. डॅरेल मिचेल देखील 22 धावा करुन परतला. यानंतर रवींद्र जडेजा आणि शिवम दुबेने डाव सावरला. या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. जडेजाने नाबाद 25 तर दुबेने नाबाद 34 धावांचे योगदान दिले. आरसीबीकडून कॅमरुन ग्रीनने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.

सलामीच्या सामन्यात आरसीबी पराभूत

प्रारंभी, आरसीबीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कॅप्टन फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली सलामी जोडी मैदानात आली. फाफने वादळी खेळी करत पावरप्लेचा चांगला फायदा घेतला आणि आरसीबीला अपेक्षित सुरुवात करुन दिली. मात्र आश्वासक सुरुवातीनंतर आरसीबीला झटपट दोन धक्के बसले. फाफ  डु प्लेसिस 35 धावावंर आऊट झाला. त्याच ओव्हरमध्ये रजत पाटीदार झिरोवर ढेर झाला. मुस्तफिजुर रहमानने या 2 विकेट्स घेत आरसीबाच्या धावांना ब्रेक लावला. यानंतर पुढील ओव्हरमध्येच ग्लेन मॅक्सवेल झिरोवर आऊट झाला. त्यानंतर विराट आणि कॅमरुन या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र यात दोघांनाही फार काही यश आलं नाही. आरसीबीने 12 व्या ओव्हरमध्येच 2 विकेट्स गमावल्या. विराट 21 धावा करुन माघारी परतला. तर कॅमरुन ग्रीनने 18 धावा जोडल्या. त्यामुळे आरसीबीची स्थिती 11.4 ओव्हरमध्ये 5 बाद 78 अशी झाली होती. यावेळी आरसीबीला दिनेश कार्तिक आणि अनुज रावत या जोडीने अडचणीतून बाहेर काढले. हे दोघे अखेरच्या बॉलपर्यंत लढले. 78 धावांवर 5 विकेटपासून अनुज रावत आणि दिनेश कार्तिकने आरसीबीला 173 धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांनी 50 बॉलमध्ये 95 धावांची भागीदारी केली. अनुजने 4 चौकार आणि 3 षटकारासह 48 धावा केल्या. अनुज शेवटच्या बॉलवर रन आऊट झाला. तर दिनेश कार्तिकने 26 बॉलमध्ये 3 चौकार आणि 2 षटकारासह 38 धावांचे योगदान दिले. सीएसकेकडून मुस्तफिजूर रहमानने 29 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या.

संक्षिप्त धावफलक : आरसीबी 20 षटकांत 6 बाद 173 (विराट कोहली 21, डु प्लेसिस 35, कॅमरुन ग्रीन 18, अनुज रावत 48, दिनेश कार्तिक नाबाद 38, रहमान 29 धावांत 4 बळी, दीपक चहर एक बळी).

सीएसके 18.4 षटकांत 4 बाद 176 (ऋतुराज गायकवाड 15, रचिन रविंद्र 37, रहाणे 27, मिचेल 22, दुबे नाबाद 34, जडेजा नाबाद 25, ग्रीन 2 तर कर्ण शर्मा व दयाल प्रत्येकी एक बळी)

विराट कोहली बारा हजारी मनसबदार

आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उरतलेल्या आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने नव्या विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यात विराट कोहलीने टी20 क्रिकेटमधील 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे तर जागतिक स्तरावरील सहावा खेळाडू ठरला आहे. या यादीत वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. ख्रिस गेलच्या नावावर 11 हजार 562 धावा आहेत. त्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक 13 हजार 360 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर केरॉन पोलार्ड (12 हजार 900 धावा) तिसऱ्या क्रमांकावर, अॅलेक्स हेल्स (12 हजार 319 धावा) चौथ्या क्रमांकावर आणि 12 हजार 65 धावांसह डेव्हिड वॉर्नर पाचव्या स्थानावर आहे. विराटच्या खात्यावर आता 12 हजार 15 धावा आहेत.

अजिंक्य रहाणेची चपळाई

35 वर्षीय अजिंक्य रहाणेने क्षेत्ररक्षणात आपली जादू दाखवली. आरसीबीचा फलंदाज विराट कोहली खेळपट्टीवर सेट होत होता. त्याची नजर मोठी खेळी खेळण्यावर होती. मात्र रहाणेच्या क्षेत्ररक्षणामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. विराटने मारलेला चेंडू डीप मिडविकेटच्या दिशेने खेळला. अजिंक्य रहाणे तिथे क्षेत्ररक्षण करत होता. धावत असताना रहाणेने चेंडू पकडला पण तो सीमारेषेकडे सरकत होता. सीमारेषेपर्यंत पोहोचण्यापूर्वी रहाणेने त्याच्या जवळ उभ्या असलेल्या रचिन रवींद्रच्या दिशेने चेंडू फेकला आणि अफलातून कॅच पकडला गेला. रहाणेचा हा झेल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article