कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चेन्नईचा मुंबईला ‘दे धक्का’

06:59 AM Mar 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्स 4 विकेट्सनी पराभूत : रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाडची अर्धशतकी खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

चेन्नई सुपरकिंग्जने रविवारी मुंबई इंडियन्सला पराभूत करत आयपीएल मोहिमेची दणक्यात सुरुवात केली. चेपॉक मैदानावर झालेल्या या सामन्यात चेन्नईने 44 धावांनी विजय मिळवला. मुंबईने चेन्नईसमोर विजयासाठी 156 धावांचे लक्ष्य ठेवले होते, हे लक्ष्य चेन्नईने 19.1 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सामनावीर ठरलेल्या रचिन रविंद्रने नाबाद 65 व ऋतुराज गायकवाडने 53 धावांची खेळी करत चेन्नईच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईने प्रथम फलंदाजीसाठी मुंबईला आमंत्रित केले. मुंबईच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्माला भोपळाही फोडता आला नाही. रियान रिकल्टनही 13 धावा काढून बाद झाला. विल जॅक्सही फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. यानंतर कर्णधार सुर्यकुमार व तिलक वर्मा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी करिष्मा दाखवेल असे असताना सुर्या नूर अहमदच्या एका चेंडूवर तो चकला आणि आणि त्यावेळी धोनीने कोणतीही संधी सोडली नाही. कारण धोनीने फक्त 0.11 सेकंदांत सूर्याची स्टम्पिंग केली आणि ही जोडी फोडली.सूर्याने यावेळी 29 धावा केल्या. सूर्या बाद झाल्यावर तिलकही लवकर बाद झाला, त्याला 31 धावा करता आल्या. हे दोघे बाद झाल्यावर दीपक चहरने 15 चेंडूत नाबाद 28 धावा करत संघाला दीडशेचा टप्पा गाठून दिला. मुंबईला 20 षटकांत 9 बाद 155 धावापर्यंत मजल मारता आली. चेन्नईकडून फिरकीपटू नूर अहमदने 4 तर खलील अहमदने 3 बळी मिळवले.

रचिन रविंद्र, ऋतुराजचा अर्धशतकी धमाका

ऋतुराज गायकवाडने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक झळकावत मुंबईवर दबाव आणला. ऋतुराज 26 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 53 धावा करत बाद झाला. पण त्याच्या खेळीसह त्याने मुंबईला बॅकफूटवर टाकले. यानंतर सर्व फलंदाज एका टोकावरून विकेट गमावत होते, पण रचिन रवींद्रने दुसऱ्या टोकाकडून सीएसकेचा डाव सांभाळत होता. रचिनने 45 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह 65 धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. जडेजा 17 धावा करत बाद झाला. चेन्नईने विजयी लक्ष्य 19.1 षटकांत पूर्ण करत शानदार विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स 20 षटकांत 9 बाद 155 (रिकल्टन 13, सुर्यकुमार यादव 29, तिलक वर्मा 31, नमन धीर 17, दीपक चहर नाबाद 28, सँटेनर 11, नूर अहमद 4 तर खलील अहमद 3 बळी)

चेन्नई सुपरकिंग्ज 19.1 षटकांत 6 बाद 158 (रचिन रविंद्र नाबाद 65, ऋतुराज गायकवाड 53, विघ्नेश पुथूर 3 बळी, जॅक्स व चहर प्रत्येकी 1 बळी).

शेर अभी बुढा नही हुआ!

मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या लढतीत महेंद्रसिंग धोनीचे स्टंपिंग इतके जलद होती की मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवला काहीच कळले नाही आणि तो आऊट झाला. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे धोनीने फक्त 0.12 सेकंदात सूर्यकुमार यादवला आऊट केले. हेच कारण आहे की सूर्यकुमार यादवला ही काय झाले हे समजू शकले नाही. धोनीचा वेग पाहून तोही आश्चर्यचकित झाला. यासह, 43 वर्षीय धोनीने दाखवून दिले आहे की त्याच्या ग्लोव्हजमध्ये अजूनही तीच जुनी धार आहे. दरम्यान, मुंबईच्या डावातील 11 व्या षटकात नूर अहमद गोलंदाजी करत होता आणि षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने पुढे जाऊन मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला. ज्याचा धोनीने पुरेपूर फायदा घेतला आणि सूर्यकुमार यादवला यष्टीचीत केले.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article