For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नईचा हैदराबादवर 78 धावांनी विजय

06:54 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
चेन्नईचा हैदराबादवर 78 धावांनी विजय
Advertisement

गायकवाड, मिचेल, यांची अर्धशतके, देशपांडेचे 4 बळी, हैदराबादचा सलग दुसरा पराभव.

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि डॅरील मिचेल यांची शानदार फलंदाजी तसेच तुषार देशपांडेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रविवारी येथे झालेल्या सामन्यात यजमान चेन्नई सुपर किंग्जने सनरायजर्स हैदराबादचा 78 धावांनी दणदणीत पराभव करत गुणतक्त्यात 10 गुणासह तिसरे स्थान मिळविले. या पराभवामुळे हैदराबाद संघाला 10 गुण घेऊनही धावसरासरी कमी असल्यामुळे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. हैदराबाद संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. गेल्या सामन्यात त्यांना बेंगळूर संघाकडून हार पत्करावी लागली होती.

Advertisement

 

चेन्नई सुपर किंग्जने हैदराबादला विजयासाठी 213 धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर हैदराबाद संघाचा डाव 18.5 षटकात 134 धावात आटोपला. प्रत्युत्तरादाखल खेळताना चेन्नईच्या अचुक गोलंदाजी आणि मिचेलच्या चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर हैदराबाद संघाचे फटकेबाजी करण्याचे मनसुबे फोल ठरले हैदराबादच्या एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. हेड 13, अभिषेक शर्मा 15, नितीशकुमार रे•ाr 15, क्लासेन 20, अब्दुल समद 19, तसेच मार्करमने 4 चौकारासह 32 धावा जमविल्या. हैदराबादच्या डावात 4 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. चेन्नईच्या तुषार देशपांडेने 27 धावात 4, तर मुस्तफीजुर रेहमान आणि महेश पथिराना यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. जडेजा आणि ठाकुर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. चेन्नई संघातील डॅरिल मिचेलने 5 अप्रतिम झेल टिपले.

हैदराबाद संघाने पॉवरप्लेच्या 6 षटकात 53 धावा जमविताना, 3 गडी गमविले. हैदराबादचे अर्धशतक 33 चेंडूत तर शतक 76 चेंडूत फलकावर लागले. या सामन्यात चेन्नईने शिवम दुबेच्या जागी शार्दुल ठाकुरला तर  हैदराबाद संघाने टी. नटराजनच्या जागी अनमोलप्रित सिंगला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात उतरविले.

 

गायकवाडचे शतक हुकले

2024 च्या आयपीएल स्पर्धेतील 46 व्या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधार गायकवाडने दमदार फलंदाजी करत 98 धावांची खेळी केली. मात्र त्याचे या स्पर्धेतील दुसरे शतक केवळ 2 धावांनी हुकले. गायकवाडला मिचेलकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 107 धावांची भागीदारी केली. मिचेल बाद झाल्यानंतर गायकवाडने शिवम दुबेसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 74 धावांची भागीदारी केली. सलामीचा फलंदाज अजिंक्य रहाणे डावातील तिसऱ्या षटकात तंबुत परतल्यानंतर चेन्नईवर  दडपण आले होते. भुवनेश्वर कुमारने रहाणेला झेलबाद केले. त्याने 12 चेंडूत 1 चौकारासह 9 धावा जमविल्या. कर्णधार गायकवाड आणि मिचेल यानी आक्रमक फटकेबाजी करत संघाला सुस्थितीत नेले. 14 व्या षटकात हैदराबादाच्या उनादकटने मिचेलला रे•ाrकरवी झेलाबाद केले. त्याने 32 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 52 धावा झळकविल्या. मिचेलने आपले अर्धशतक 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 29 चेंडूत झळकविले. कर्णधार गायकवाड या स्पर्धेतील आपले दुसरे शतक पूर्ण करेल असे वाटत असतानाच नटराजनने त्याला झेलबाद केले. गायकवाडने 54 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 98 धावा झोडपल्या. गायकवाडने आपले अर्धशतक 27 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. शिवम दुबेने 20 चेंडूत 4 षटकार व 1 चौकारासह नाबाद 39 धावांची खेळी केल्याने चेन्नईला 212 धावापर्यंत मजल मारता आली. धोनी 2 चेंडूत 1 चौकारासह 5 धावावर नाबाद राहिला. चेन्नईला अवांतर 9 धावा मिळाल्या. चेन्नईने पॉवरप्लेच्या 6 षटकात 50 धावा जमविताना 1 गडी गमविला. चेन्नईचे अर्धशतक 33 चेंडूत, शतक 65 चेंडूत, दीडशतक 192 चेंडूत तर द्विशतक 113 चेंडूत फलकावर लागले. गायकवाड आणि दुबे यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 21 चेंडूत नोंदविली. चेन्नईच्या डावामध्ये 8 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. हैदराबादतर्फे भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि उनादकट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपर किंग्ज 20 षटकात 3 बाद 212 (रहाणे 9, गायकवाड 98, मिचेल 52, शिवम दुबे नाबाद 39, धोनी नाबाद 5, अवांतर 9, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उनादकट प्रत्येकी 1 बळी)., सनरायजर्स हैदराबाद 18.5 षटकात सर्व बाद 134 (मार्करम 32, क्लासेन 20, समद 19, अभिषेक शर्मा 15, रे•ाr 15, हेड 13, अवांतर 3, तुषार देशपांडे 4-27, पथीराना 2-17, मुस्तफिजुर रेहमान 2-19, जडेजा 1-22, ठाकुर 1-27.

Advertisement
Tags :

.