For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हा रुग्णालयात किमोथेरपी सेंटर सुरु

01:30 PM Sep 25, 2025 IST | Radhika Patil
जिल्हा रुग्णालयात किमोथेरपी सेंटर सुरु
Advertisement

सातारा :

Advertisement

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील बंद झालेल्या किमोथेरपी सेंटरची आरोग्य विभागाशी पाठपुरावा करुन पुन्हा नव्याने सुरु करण्यात आले आहे. यामुळे जिह्यातील कर्करोग रुग्णांना दिलासा मिळाला आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले.

किमोथेरपी सेंटरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. करपे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. राहुलदेव खाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. सुभाष कदम डॉ. अरुंधती कदम, डॉ. उल्का झेंडे, डॉ. संजीवनी शिंदे, डॉ. प्रमा गांधी उपस्थित होते.

Advertisement

जे रुग्ण किमोथेरपीवर आहेत, अशा रुग्णांनी आपले सर्व रिपोर्ट व किमोथेरपीबाबतचे कागदपत्रे घेऊन या रुग्णालयातील एनसीडी विभागाशी संपर्क साधावा व या उपचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. करपे यांनी उद्घाटन प्रसंगी केले.

Advertisement
Tags :

.