चिरेखाणी बुजवण्याकरिता मळेवाड येथे टाकले जातेय केमिकलयुक्त वेस्टेज
रोगराई पसरण्याची शक्यता ; महसूल , आरोग्य खात्याने लक्ष घालावे ; मनसे संपर्क प्रमुख महेश परब यांची मागणी
प्रतिनिधी
बांदा
बंद झालेल्या चिरेखाणी बुजवण्याकरिता परराज्यातील एका कंपनीचे केमिकल युक्त वेस्टेज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळेवाड गावात आणून टाकले जाते. त्यामुळे त्या परिसरातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो तसेच विहिरीचे पाणी दूषित होऊन रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी यामागे मळेवाड मधील काही दलाल मोठी रक्कम घेऊन हे केमिकल युक्त वेस्टेज चिरेखाणीच्या मालकांना हाताशी धरून बंद झालेल्या चिरेखाणी मध्ये रात्रीच्या वेळी लपून छपून भरणी केली जाते. यासाठी चिरेखाण मालक व स्थानिक दलाल यांना कंपनीकडून मोठी रक्कम दिली जाते. अशी कुजबुज मळेवाड मधील नाक्यानाक्यावर आहे. तरी यावर महसूल खाते व आरोग्य विभाग यांच्याकडून त्वरित सर्व बंद झालेल्या चिरेखाणी तपासून त्यातील भरणी केलेल्या मातीचा नमुना तपासणी करिता पाठवावा.मनसेचे सावंतवाडी संपर्क प्रमुख महेश परब यांनी केली आहे.