महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ब्रेकअप, घटस्फोटानंतर करतात जल्लोष

06:49 AM Dec 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नातेसंबंध तुटल्यावर संबंधित व्यक्ती कोलमडून पडत असल्याचे चित्र सर्वसाधारणपणे दिसून येते, ब्रेकअप असो किंवा घटस्फोट झाल्यावर स्वत:ला सावरणे अत्यंत अवघड असते. परंतु चीनमध्ये काही वेगळेच दिसून येत आहे. येथे लोक ब्रेकअप आणि घटस्फोट झाल्यावर मोठमोठ्या पार्ट्या आयोजित करत असून आनंदाने छायाचित्रे काढून घेत आहेत. म्हणजेच नाते तुटल्याचा जल्लोष ते करत आहेत. अलिकडेच एका महिलेने स्वत:च्या घटस्फोटाचा जल्लोष केला असून त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. यानंतर या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

सॉन्ग नावाच्या महिलेने दक्षिण पूर्व चीमधील गुआंगडोंग प्रांतात एक मोठ्या पार्टीचे आयोजन केले, तिचे चार वर्षांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले होते, महिला आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी लाल रंगाचा एक बॅनर झळकविला होता, त्यावर एक ‘खराब विवाह संपुष्टात आला, आमची मैत्रिण पुन्हा सिंगल झाल्याने आनंद’ असे नमूद होते. यानंतर महिलेने एक गाणे म्हटले, ज्यात ब्रेकअप चांगला असल्याचा आशय होता.

Advertisement

या 34 वर्षीय महिलेन घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान एक फोटोग्रॉफर स्वत:च्या सोबत ठेवला होता, या फोटोग्राफरने महिला आणि तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीने विभक्त होण्याचे प्रमाणपत्र मिळविण्याचा क्षणही कॅमेऱ्यात कैद आहे. पती फसवत असल्याची जाणीव या महिलेला मे महिन्यात झाली होती. यानंतर तिने घटस्फोट घेत नवे जीवन सुरु करण्याचा निर्णय घेतला. सॉन्ग सोबत अनेक महिलांनी अशाचप्रकारे स्वत:च्या नात्याच्या शेवटाचा जल्लोष केला आहे. स्थानिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंबंधीच्या पोस्टला 20 कोटीहून अधिक ह्यूज मिळाले आहेत.

आतापर्यंत मी 7 घटस्फोटांचे छायाचित्रण केले असल्याचे एका फोटोग्राफरने सांगितले आहे. चीनमध्ये घटस्फोटाचे प्रमाण 2000 साली 0.096 टक्के होते. जे 2020 मध्ये वाढून 0.31 टक्के झाले आहे. परंतु देशात घटस्फोट कूलिंग-ऑफ कायदा लागू झाल्यावर 2021 मध्ये हे प्रमाण कमी होत 0.2 टक्के झाले. यांतर्गत जोडप्याला कागदोपत्री कार्यवाहीला अंतिम स्वरुप देण्यापूर्वी 30 दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. घटस्फोटाची छायाचित्रे आणि जल्लोष पाहता घटस्फोटाची सामाजिक मान्यता वाढत असल्याचे स्पष्ट होते. पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक स्वरुपात घटस्फोटासाठी पुढाकार घेत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत असल्याचे पेकिंग विद्यापीठाच्या सेंटर फॉर सोशल रिसर्चचे प्राध्यापक यू जिया यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article