नंदिनी वगळता इतर तुपांच्या नमुन्यांची तपासणी करा
आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांची अन्न स़ुरक्षा आयुक्तांना सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
नंदिनी तूप वगळता इतर तुपाच्या नमुन्यांची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिल्या आहेत. तिऊपती लाडूच्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याचे प्रयोगशाळेत उघड झाल्यानंतर मंत्र्यांनी हा आदेश जारी केला आहे. बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नंदिनी तूप व्यतिरिक्त इतर तुपाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्याची तपासणी करणे गरजेचे आहे. प्रसादाचे नमुने न तपासता थेट तुपाची तपासणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात वापरल्या जाणाऱ्या तुपाची तपासणी करण्याचे निर्देश आपण अन्न सुरक्षा आयुक्तांना दिले आहेत. नमुना संकलनाची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. तिऊपतीप्रमाणे राज्यभरात वापरल्या जाणाऱ्या तुपामध्ये चरबीचे प्रमाण आहे का? त्याची तपासणी केली जात आहे, अशी माहितीही मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली.
तामिळनाडूसह विविध राज्यांमधून कर्नाटकात तूप येते. सर्व तुपाचे नमुने गोळा करून तपासण्याची सूचना अन्न सुरक्षा आयुक्तांना केली आहे. आम्ही प्रसादाचे नमुने तपासत नसल्याचे सांगत इतर पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्मयता फारच कमी आहे. त्यामुळे आंध्रच्या मुख्यमंत्र्यांनी तुपात वेगवेगळ्या पॅटचे प्रमाण असल्याचे म्हटले आहे, ही चिंतेची बाब आहे. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या वक्तव्यानंतर आम्ही यावर गांभीर्याने विचार केला आहे, असेही मंत्री गुंडूराव यावेळी म्हणाले.