बाचीजवळ तपासनाका सुरू
09:59 AM Oct 19, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
Advertisement
बेळगाव : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमेवर बॅरिकेड्स उभे करून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी ही माहिती दिली आहे. बाचीजवळ बॅरिकेड्स उभे करण्यात आले आहेत. सीमेवरील हालचालींवर आता पोलिसांचे लक्ष असणार आहे. दरम्यान गुरुवार दि. 17 ऑक्टोबर रोजी बेळगाव शहर व उपनगरात वाहतूक नियम मोडणाऱ्या 170 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ट्राफिक मॅनेजमेंट सेंटरनेही 247 जणांवर कारवाई केल्याचे आयुक्तांनी सांगितले.
Advertisement
Advertisement
Next Article