महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गर्भवती महिलांची फसवणूक;अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून जागृती

10:49 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती : फशी न पडण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : पोषण ट्रॅकर अॅपच्या माध्यमातून गर्भवती महिलांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक सुरू आहे. यासंबंधी संपूर्ण राज्यातील 70 हजार अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जागृती करण्यात येत असल्याचे महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. शनिवारी पत्रकारांशी बोलताना पोषण ट्रॅकर अॅप हॅक झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नये. या अॅपच्या माध्यमातून महिलांची माहिती घेऊन त्यांची फसवणूक केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. महिलांनी सायबर गुन्हेगारांच्या कारवायांना फशी पडू नये, असे आवाहनही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले आहे. पोषण ट्रॅकर अॅपची देखभाल केंद्र सरकार करते. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर लगेच केंद्र सरकारला यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. 70 हजार अंगणवाडी कार्यकर्त्या व साहाय्यिकांना या फसवणुकीच्या प्रकारासंबंधी माहिती पाठवून जागृती करण्यात येत आहे. यासंबंधी कारवाई करण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांना करण्यात आली असून महिलांनी फशी पडू नये, असे आवाहन लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले आहे.

Advertisement

गुन्हेगारांच्या कारवायांविषयी सावधगिरी बाळगा...

दरम्यान, गेल्या आठवड्याभरात फसवणूक झालेल्या पाच महिलांनी येथील शहर सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दिली असल्याची माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली असून 75 हजार रुपयांहून अधिक रक्कम सायबर गुन्हेगारांनी हडप केली आहे. महिलांनी या गुन्हेगारांच्या कारवायांविषयी सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article