For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमी दरातील टूर, पर्यटकांना वाईट अनुभव भरपूर

05:57 PM Jun 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
कमी दरातील टूर  पर्यटकांना वाईट अनुभव भरपूर
कोल्हापूर कमी दरातील टूर,
Advertisement

‘चुना’ लावणाऱ्यापासून सावध रहा
-देशात असो वा परदेशात..अनुभवी कंपनीकडूनच प्रवास करा
-फसवणूकीचा अनेकांना आला अनुभव
►विद्याधर पिंपळे
कोल्हापूर
कमी दरात टूर पॅकेजचे आमिष दाखवून पर्यंटकांना ‘चुना’ लावणाऱ्या पर्यटक कंपन्यापासून आता सावध राहण्याची गरज आहे. कमी दरामध्ये देशार्तंगत व परदेशामध्ये कमी दराच्या पॅकेजमध्ये सहली काढण्याचा धंदा वाढत चालला आहे. यामुळे कोल्हापूरसह अनेक जिल्हयामधील पर्यटकांना अशा तुटपुंज्या अनुभवावर सहली काढणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. कमी दरामध्ये टूर पँकेजव्दारे फसवणूकीचे प्रकार वाढत चालले आहेत.
धार्मिक, व इतर सहलींचा सिझन ओळखूनच, कमी दरामध्ये पॅकेज देण्याचा गोरख धंदा वाढत चालला आहे. एखाद्या टूर वा ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये जुजबी अनुभवावर पर्यटनाचा धंदा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जगप्रसिध्द केदारधाम यात्रेसाठी अनेक भावी मोठया संख्येने जात असतात. याच्या दर्शनासाठी नामंवंत टूर अॅन्ड टॅव्हल्स कंपन्या सर्व सोयीसह पॅकेज जाहीर करतात. यापेक्षा कमी दरामध्ये पॅकेज देत असल्यास यामध्ये सावध राहणे गरजेचे आहे. कारण कमी दरात पॅकेज देऊन, फसवण्याचा अनुभव अनेकांना आला आहे.
कोल्हापूरसह शेजाऱ्या जिल्हातील अनेक भाविकांना कमी पॅकेजमध्ये केदारधाम टूर काढली होती. यासाठी ऑनलाईन नोंदणी करून पैसे भरून घेतले होते. ही नोंदणी बनावट असल्याचे आढळून आले. या भाविकांना केदारचे दर्शन न घेता, अर्ध्या रस्त्याने परतावे लागले. बनावट नोदंणी करणारी टूर व टॅव्हलस कंपनी ही अनाधिकृत असल्याचे पुढे आले.
काश्मीर सहलीच्या बहाण्याने पर्यटकांची 11 लाख रूपयाची फसवणूक झाल्याचा प्रकार पुण्यामध्ये उघडकीस आला. तर मुंबई येथील टूर ऑपरेटरने रत्नगिरीतील अनेकांना लाखो रूपयाला चुना लावला आहे. परदेशात गेल्यावर हॉटेल बुकींग व विमानाची तिकीटे खोटी असल्याचे आढळून आले. अधिकृत नेहमीच्या टुर ऑपरेटरपेक्षा सुमारे 10 ते 15 हजार रूपये कमी बजेटमध्ये टूर ही टूर काढण्यात आली होती. विमानाचे तिकीट वगळता हॉटेल, परतीचे विमान तिकीट बोगस असल्याचे आढळून आले. यामुळे परदेशात गेलेल्या या पर्यटकांना पदरचे पैसे भरून परत भारतात यावे लागले. एवढेच नव्हे तर स्वस्तात डॉलर देतो असे सांगून लाखो रूपये उकळले असल्याचे सांगण्यात आले. देशात असो की परदेशात असो आपली टूर विश्वासधारक कंपनीकडूनच काढावी.
---------------------------
अनुभवी व जुन्या टूर कंपनीमार्फतच टूर काढा
गेल्या कांही दिवसापासून कमी बजेट पॅकेजमध्ये टूर काढण्याऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा लोकाकडून पर्यटकांची मोठी फसवणूक झाल्याच्या तक्रारी वाढल्dया आहेत. कोणतीही टूर काढण्यापूर्वी अनुभवी टूर कंपनीशी संपर्क साधावा. पॅकेजमध्ये रेल्वे, बस, विमान यांचे येण्या-जाण्याचे भाडे. स्टार हॉटेलचे भाडे, जेवण (शाकाहारी-मांसाहारी) , परकीय चलन, प्रेक्षणिय स्थळांचे भाडे आदीची सविस्तर माहीती घेणे गरजेचे आहे. किंवा संघटनेशी संपर्क साधावा.
-बळीराम वराडे, अध्यक्ष , टॅव्हल्स एजंट असोसिएशन कोल्हापूर 
---------------------------

Advertisement

Advertisement
Tags :

.