कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हणजूण येथील जमीन हडपप्रकरणी सुहैलसह चौघांविरोधात आरोपपत्र

01:06 PM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : हणजूण येथे जमीन हडप प्रकरणी गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याच्यासह राजकुमार मैथी, रॉयसन्स रॉड्रिग्ज आणि डेन्वर डिसोझा यांच्याविरोधात म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात 569 पानांचे सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. हणजूण येथील सर्व्हे क्रमांक 486/6 मधील जमीन हडप प्रकरणात गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोलाची कामगिरी करताना मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याच्यासह राजकुमार मैथी, रॉयसन्स रॉड्रिग्ज आणि डेन्वर डिसोझा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. याआधी एसआयटीने मागील पंधरा दिवसांत वरील संशयिताविरोधात आणखी तीन आरोपपत्रे दाखल केली होती.

Advertisement

या प्रकरणी विल्मा डिसोझा यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, तिच्या पूर्वजांची हणजूण येथील सर्व्हे क्र. 486/6 येथील 1,875 चौ.मी. जमीन आहे. ही जमीन संशयित ब्रांका दिनिज, पावलिना दिनिज, मारियानो गोन्साल्विस आणि रॉयसन रॉड्रिग्ज, मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस, राजकुमार मैथी, डॅनवर डिसोझा आणि इतरांनी हडप केल्याचे म्हटले होते.  या तक्रारीची दखल घेऊन तत्कालीन एसआयटीचे निरीक्षक सूरज सामंत यांनी वरील संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांची बदली झाल्यानंतर वरील प्रकरण एसआयटीचे उपनिरीक्षक योगेश गडकर यांच्याकडे वर्ग करण्यात आले. त्यांनी या प्रकरणी 7 ऑगस्ट  2025 रोजी रॉयसन रॉड्रिग्जला अटक केली. त्यानंतर एसआयटीने मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याला अटक करून कारवाई केली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article