चन्नम्मा एक्स्प्रेस धावली विद्युत इंजिनवर
30 वर्षांनंतर प्रयोग यशस्वी
बेळगाव : बेळगाव शहराला मागील 30 वर्षांपासून बेंगळूर शहराशी जोडणाऱ्या राणी चन्नम्मा एक्स्प्रेसचा नवा अध्याय सुरू झाला आहे. डिझेल इंजिनवर धावणारी चन्नम्मा एक्स्प्रेस बुधवारी पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिनवर धावली. यामुळे गतीमध्ये वाढ तर होईलच, त्याचबरोबर प्रवासाचा कालावधीही कमी होणार आहे. बेळगावमधून बेंगळूरला जाण्यासाठी 30 वर्षांपूर्वी एकमेव चन्नम्मा एक्स्प्रेस उपलब्ध होती. सायंकाळी बेळगावमधून निघाल्यावर दुसऱ्या दिवशी पहाटे प्रवासी बेंगळूरला पोहोचत असल्याने या एक्स्पे्रसला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. 15 ऑगस्ट 1995 मध्ये या एक्स्प्रेसला सुरुवात झाली. मागील 30 वर्षांपासून ही एक्स्प्रेस अविरतपणे सेवा देत आहे. पूर्वी कोल्हापूर-बेंगळूर अशी धावणारी एक्स्प्रेस आता मिरज-बेंगळूर दरम्यान धावत आहे. मागील 30 वषर्पांसून डिझेल इंजिनवर धावणारी चन्नम्मा एक्स्प्रेस बुधवारी पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिनवर धावली. बेळगाव ते बेंगळूर दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने विद्युत इंजिनची सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांमधून आनंद व्यक्त होत आहे. बुधवारी सकाळी एक्स्प्रेस रेल्वेस्थानकात दाखल होताच काही प्रवाशांनी हार घालून स्वागत केले.