कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘त्या’ घटनांना बदलती जीवनशैली कारणीभूत!

11:04 AM Jul 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव : हासनमधील मृत्यू प्रकरणांसंबंधीचा अहवाल सादर

Advertisement

बेंगळूर : हासन जिल्ह्यात महिनाभरापासून हृदयविकाराच्या धक्क्याने अनेक तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेसंबंधी जनतेतून चिंता व्यक्त झाल्यानंतर राज्य सरकारने तांत्रिक समिती नेमली होती. या समितीचा पूर्ण प्रमाणातील अहवाल गुरुवारी प्राप्त झाला आहे. कोणीही चिंता करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली या मृत्युंना कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया अहवाल स्वीकारल्यानंतर आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली. तांत्रिक समितीने अहवाल सादर केल्यानंतर या समितीतील सदस्यांची आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी बैठक घेतली. हासनमध्ये हृदयविकाराने अचानक मृत्यू होण्यास मधूमेहृ मद्यपान आणि कौटुंबीक पार्श्वभूमी कारणे असल्याचे समितीने सांगितले. बेंगळूरच्या जयदेव हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना दिनेश गुंडूराव म्हणाले, जयदेव हृदयरोग विज्ञान आणि संशोधन संस्थेच्या संचालकांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीने 2-जून 2025 मध्ये हासन जिल्ह्यातील 24 मृत्यू प्रकरणांचा अध्ययन अहवाल सादर केला आहे. हा अहवाल यावेळी प्रसिद्ध करण्यात आला.

Advertisement

अहवालात 24 मृत्युपैकी 14 मृत्यू हे 45 वर्षाखालील व्यक्तींचे आहेत. तर 10 जणांचे वय 45 वर्षांहून अधिक आहे. 24 पैकी 4 मृत्यू हृदयाशी संबंधित आजारांमुळे झालेले नाहीत. त्यापैकी एकाचा मृत्यू दीर्घकालिन मूत्रपिंड समस्येमुळे, एकाचा वाहन अपघातामुळे, जठराशी संबंधित समस्येमुळे आणि एकाचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला आहे. उर्वरित 20 जणांचे मृत्यू हृदयाशी संबंधित असल्याचे आढळले आहे. 75 टक्क्यांपेक्षा जास्त मृतांमध्ये लठ्ठपणा, मद्यपान, धुम्रपान आणि तीव्र रक्तदाबाची समस्या होती, असे अहवालात नमूद आहे. 19, 21, 23, 32, 37, 38 आणि 43 वयाच्या तरुणांचे अचानक झालेले मृत्यू चिंताजनक आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बऱ्याच प्रकरणांमध्ये मृतांना मृत्यूपूर्वी आरोग्य सुविधेसाठी हॉस्पिटलमध्ये आणले नाही. हॉस्पिटलमध्ये मृत घोषित केलेल्यांमध्येही अनेकांची औपचारिक उत्तरीय तपासणी केली केली नाही. उत्तरीय तपासणी अहवालाचा अभाव, आवश्यक क्लिनिकल तपासणी (ईसीजी, कार्डियाक एंजाईम) अनुपलब्धता व कुटुंबातील सदस्यांकडून मर्यादित सहकार्य मिळत असल्याने मृत्यूचे नेमके कारण जाणून घेणे कठीण झाले आहे.

सीपीआर प्रशिक्षण दिले जाईल!

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि जिममधील प्रशिक्षक यांसारख्या गटांना सीपीआर प्रशिक्षण दिले जाईल. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व सामूदायिक आरोग्य केंद्रांमध्ये हृदयज्योती योजनेचा विस्तार करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येतील. ऑटोरिक्षा, कॅब चालकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आजची बदलती जीवनशैली, योग्य वेळी भोजन न करणे, योग्य झोप न घेणे, चुकीच्या आहार सेवनाच्या सवयी, तणाव किंवा दडपणाखाली काम कर करणे या अचानक मृत्यूची कारणे आहेत. 15 वर्षांखालील मुलांची आरोग्य तपासणी केली जाईल. जेणेकरून काही अनुवंशिक समस्या असतील तर त्या ओळखून ठोस कार्यवाही केली जाईल, असे मंत्री गुंडूराव यांनी सांगितले. हासन जिल्ह्यातील ही समस्या वेगळी नाही. नियमित व्यायाम, पुरेशी झोप, पौष्टिक आहार, ताण-तणावाचे व्यवस्थापन यावर भर दिला पाहिजे. निरोजी जीवनशैलीद्वारे सर्वांनी जागरूक असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article