महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डीएल, आरसीचे बदलणार स्वरुप

06:24 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्य परिवहन खात्याकडून तयारी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्यातील वाहनचालकांना देण्यात येणारे ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्राचे स्वरुप बदलले जात आहे. मायक्रोचिप आणि क्मयूआर कोडसह डीएल आणि आरसी शॉर्ट कार्ड वितरित करण्याची तयारी राज्य परिवहन खाते करत आहे. डीएल आणि आरसीचे स्वरुप संपूर्ण देशात सारखेच असावे यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने तयार केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य परिवहन खात्याने पुढाकार घेतला आहे.

एमओआरटीएचने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ड्रायव्हिंग लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्राची छपाई आणि वितरण करणाऱ्या खासगी संस्थांसाठी निविदा प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार या महिन्याच्या अखेरीस कंत्राटदाराची निवड अंतिम करून सप्टेंबरपासून नवीन प्रकारचे डीएल आणि आरसी वितरित करण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला आहे.

आतापर्यंत डीएलमध्ये ड्रायव्हरचे नाव, जन्मतारीख, पत्ता, रक्तगटाचा तपशील असायचा. नवीन डीएलमध्ये या तपशीलांसह डीएलधारक अवयव दाता आहे की नाही हे देखील नमूद केले जाणार आहे. याचबरोबर डीएल धारकाचा मोबाईल नंबर, त्याचे नातेवाईक किंवा तात्काळ संपर्क होणारा मोबाईल नंबर देखील नमूद केले जात आहे.

सध्याच्या डीएल आणि आरसीमध्ये फक्त एका बाजूला सर्व तपशील असून दुसऱ्या बाजूला मायक्रोचिप बसविण्यात आले आहे. नवीन डीएल आणि आरसीच्या दोन्ही बाजूंना वाहन आणि वाहन मालक किंवा चालक यांचा तपशील प्रविष्ट केला जाईल. डीएल आणि आरसी लेझर प्रिंटिंगवर मुद्रित केले जाणार आहेत. क्यूआर कोड स्कॅन केल्यास डीएल आणि आरसीशी संबंधित सर्व तपशील समजणार आहे.

आतापर्यंत डीएल आणि आरमध्ये वाहन आणि चालकाचा संपूर्ण तपशील नव्हता. नवीन डीएल आणि आरसीमध्ये चालकांनी कोणत्या दिवशी, कोणत्या प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे आणि त्यासाठी दंड भरला आहे का, याचा तपशील उपलब्ध असेल. हे तपशील परिवहन खात्याकडून वेळोवेळी अपडेट केले जाणार आहेत. डीएल धारकांच्या तपशिलांसह, त्यांची शारीरिक वैशिष्ट्यो देखील नमूद केली जाणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article