For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अयोध्या बलात्कार पिडीतेचा गर्भपात

06:53 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
अयोध्या बलात्कार पिडीतेचा गर्भपात
Advertisement

भ्रूणाची डीएनए चाचणी होणार, पुरावा मिळणार

Advertisement

वृत्तसंस्था / लखनौ

अयोध्येत एका अल्पवयीन बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणात आरोपींविरुद्ध भक्कम पुरावा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बलात्कार पिडिता 12 आठवड्यांची गर्भवती होती. तिच्या आईच्या अनुमतीने तिचा गर्भपात बुधवारी तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत शासकीय रुग्णालयात कायदेशीरपणे करण्यात आला. तसेच पिडितेचे वयही 14 वर्षे 6 महिने असल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

या पिडितेचा भ्रूण गर्भपातानंतर डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात आला आहे. डीएनए चाचणीतून या भ्रूणाचा पिता कोण आहे हे स्पष्ट होणार आहे. सध्या पिडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी समाजवादी पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांची नावे मोईद खान आणि राजू खान अशी आहेत. पिडितेच्या भ्रूणाचा डीएनए या आरोपींशी जुळला तर त्यांनीच या पिडितेशी दुष्कर्म केल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध होणार आहे. हा भक्कम पुरावा पोलिसांपाशी असू शकतो.

मिळणार शासकीय भरपाई

या पिडितेला उत्तर प्रदेश शासनाच्या नियमांनुसार भरपाई दिली जाण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या राणी लक्ष्मीबाई साहाय्यता कोषातून या पिडितेला 3 लाख ते 10 लाख रुपयांचे साहाय्यता धन मिळू शकते, अशी माहिती राज्याच्या बालकल्याण समितीचे अध्यक्ष सर्वेश अवस्थी यांनी दिली. याशिवाय मुख्यमंत्री बालसेवा योजनेच्या अंतर्गत पिडितेचा एक भाऊ आणि एक बहीण यांना प्रत्येक महिन्याला प्रत्येक 2,500 रुपयांचे साहाय्यता धन मिळेल. पोलिसांनी आरोपींविरोधात दोषारोपपत्र अपलोड केल्यानंतर ही प्रक्रिया गतीमान होणार आहे. फैझाबाद जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना प्रक्रिया प्रारंभ करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पिडितेच्या परिवाराला संरक्षण पुरविण्यात आले आहे.

आमिषे दाखविण्याचा प्रयत्न ?

पिडितेने तक्रार मागे घ्यावी, यासाठी तिच्या आईला आमिषे दाखविण्यात येत आहेत, असा आरोप केला जात आहे. तथापि, पिडिता अल्पवयीन असल्याने आता तक्रार मागे घेता येणार नाही, असेही काही कायदेतज्ञांचे मत आहे. सध्या डॉक्टर्स पिडितेच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement
Tags :

.