राज्योत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल
शुक्रवारी पहाटेपासूनच वाहनांवर बंदी
बेळगाव : राज्योत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. 1 नोव्हेंबर रोजी बेळगाव शहरात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली असून शहरातील वाहतूकही अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. पोलिसांनी यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 1 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 ते 2 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 2 पर्यंत बेळगाव शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असणार आहे. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्ग सूचविण्यात आले आहेत. चिकोडी, संकेश्वर, कोल्हापूरहून केएलईमार्गे चन्नम्मा सर्कलकडे येणारी सर्व वाहने जिनाबकुळजवळ वळविण्यात येणार आहेत. बॉक्साईट रोड, हिंडलगा फॉरेस्ट नाका, हिंडलगा गणेश मंदिर, महात्मा गांधी चौक (अरगन तलाव), शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शरकत पार्क, ग्लोब थिएटर सर्कलमार्गे खानापूर रोडवर वळविण्यात येणार आहेत.
खानापूर, गोव्याहून येणारी वाहने ग्लोब थिएटरपासून वळवून शरकत पार्क, शौर्य चौक, महात्मा गांधी सर्कल, हिंडलगा गणेश मंदिर, हिंडलगा रोड, फॉरेस्ट नाक्यापासून बॉक्साईट रोडला वळविण्यात येणार आहे. परिवहन मंडळाच्या बस मात्र हिंडाल्को सर्कल अंडरब्रिज, कॅन्सर इस्पितळापासून कनकदास सर्कलमार्गे बसस्थानकावर जाणार आहेत. जिजामाता सर्कल, देशपांडे पेट्रोलपंपहून नरगुंदकर भावे चौक, कंबळी खूट परिसरात जाणारी सर्व वाहने पिंपळकट्ट्यापासून पाटील गल्ली, शनिमंदिर मार्गे स्टेशन रोडकडे वळविण्यात येणार आहेत. जुन्या पी. बी. रोडवरून खानापूरकडे जाणारी वाहतूक जिजामाता सर्कलहून सर्किट हाऊस, अशोक स्तंभ, कनकदास सर्कलमार्गे राष्ट्रीय महामार्ग, बॉक्साईट रोड मार्गे वळविण्यात येणार आहे. मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना केईबी, जुने भाजी मार्केट, न्याय मार्गपासून धर्मनाथ भवनपर्यंत, पट्टेद इस्पितळपासून गँगवाडी सर्कलपर्यंत, सीपीएड् मैदान, क्लब रोडपासून महात्मा गांधी सर्कलपर्यंत, यंदे खूट मार्गे शौर्य सर्कल, यंदे खूटपासून महात्मा गांधी सर्कलपर्यंत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.