For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यायालयांमधील न्यायदेवतेच्या स्वरुपात परिवर्तन

07:00 AM Oct 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
न्यायालयांमधील न्यायदेवतेच्या स्वरुपात परिवर्तन
Advertisement

नवी दिल्ली : न्यायालयांमधील न्यायदेवतेच्या स्वरुपात परिवर्तन करण्यात आले आहे. न्यायदेवतेच्या नेत्रांवरची काळी पट्टी काढण्यात आली असून हातातील तलवारीच्या स्थानी आता भारताच्या राज्यघटनेची प्रत ठेवली आहे. देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या महत्वाच्या निर्णयाची घोषणा केली आहे. स्वत: सरन्यायाधीशांनी या संबंधी पुढाकार घेतला होता. इंग्रजांचा वारसा सोडून आता आपल्याला पुढे गेले पाहिजे, अशी त्यांची संकल्पना आहे. न्यायदेवता नेत्र झाकून घेत नाही, तर सर्वांकडे समभावनेने पाहते. तसेच ती तलवार नव्हे, तर भारताच्या राज्यघटनेच्या अनुसार निर्णय देते, असा संदेश न्यायदेवतेच्या या परिवर्तित स्वरुपाने दिला आहे, असे वक्तव्य सरन्यायाधीशांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.