For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

06:55 AM Sep 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
आज शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल
Advertisement

ईद-ए-मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त : पोलीस आयुक्तांची माहिती

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

रविवार दि. 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त वाढविण्यात आला असून याबरोबरच वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे यासंबंधीची माहिती दिली आहे.

Advertisement

5 सप्टेंबर रोजी होणारी मिरवणूक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. पिंपळकट्ट्यापासून फोर्ट रोड, मुजावर खूट, मध्यवर्ती बसस्थानक, मार्केट पोलीस स्टेशन, संगोळ्ळी रायण्णा चौक, डी. सी. गेट, राणी चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, यंदे खूट, धर्मवीर संभाजी चौक, फिश मार्केट, ग्लोब सर्कल मार्गे या मिरवणुकीचा आसद खान दर्गा परिसरात समारोप होणार आहे.

या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी 8 पासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. किल्ला तलाव, अशोक पिलर, आरटीओ सर्कल, चन्नम्मा सर्कलमार्गे खानापूर रोडला जाणारी वाहतूक लेकव्ह्यू इस्पितळाजवळून वळवून कनकदास सर्कल, कॅन्सर इस्पितळ, केएलई क्रॉस, हिंडाल्को अंडरब्रिज, बॉक्साईट रोड, हनुमाननगर डबल रोड, हिंडलगा गणेश मंदिर, महात्मा गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय नं. 2, शरकत पार्क, एमएलआयआरसी कँटीन क्रॉस, मिलिटरी महादेव मंदिर क्रॉसवरून खानापूर रोडला वळविण्यात येणार आहे.

गोगटे सर्कलवरून शहरात येणारी वाहने काँग्रेस रोड, मिलिटरी महादेव मंदिर मार्गे हिंडलगा गणेश मंदिर, हनुमाननगर डबल रोडवरून

बॉक्साईट रोडवरून राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात येणार आहे. गोगटे सर्कलहून रेल्वेस्टेशन, हेडपोस्ट ऑफिस सर्कलहून शनिमंदिर, कपिलेश्वर उ•ाणपूल, बँक ऑफ इंडिया सर्कल, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल मार्गावरील वाहतूक भातकांडे स्कूलवरून वळवून जुन्या पी. बी. रोडवर जाऊ देण्यात येणार आहे. नाथ पै सर्कलवरून बँक ऑफ इंडिया, एसपीएम रोडमार्गे कपिलेश्वर उ•ाणपुलाकडे येणारी वाहतूक  भातकांडे स्कूल क्रॉसवरून जुन्या पी. बी. रोड किंवा खासबाग बसवेश्वर सर्कल, संभाजी गल्ली मार्गे वळविण्यात येणार आहे. जिजामाता चौकपासून देशपांडे पेट्रोलपंप, नरगुंदकर भावे चौक, कंबळी खूट, पिंपळकट्टा, पाटील गल्ली परिसरात येणारी वाहतूक व्हीआरएल लॉजिस्टीक, भातकांडे स्कूल क्रॉस, बँक ऑफ इंडिया सर्कल, महात्मा फुले रोडवरून गोवावेसकडे वळविण्यात येणार आहे.

मिरवणूक संपेपर्यंत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी

मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी 8 पासून मिरवणूक संपेपर्यंत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असणार आहे. मिरवणूक मार्गावर वाहने उभी करण्यासही बंदी असणार आहे. महिला पोलीस ठाण्याच्या पाठीमागे, सरदार्स हायस्कूल मैदान, जुने भाजी मार्केट व कॅम्प येथील कॅटल मार्केटजवळ पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.