राज्याच्या गृह विभागाकडून ई चालान मशिनमध्ये बदल
कोल्हापूर :
हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वाराबरोबर दुचाकीच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीविरोधी पोलिसांच्याकडून वाहतुक कारवाई केली जाते. पण या कारवाईची ई चालान मशिनमध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि त्यांच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने ही हेल्मेटचा वापर न केल्याबाबतच्या कारवाईची राज्याच्या गृह खात्याला स्वतंत्र माहिती मिळत नव्हती. ती माहिती मिळावी, याकरीता ई चालान मशिनमध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे.
या ई चालान मशिन मधील बदलामुळे राज्याच्या गृह विभागाला आता हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वाराबरोबर दुचाकीच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीविरोधी केलेल्या कारवाईची वेगवेगळी माहिती मिळणार आहे. ई चालान मशिन मधील बदलाविषयीची माहिती राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) अरविंद साळवे यांनी राज्यातील पोलीस आयुक्त, पोलीस सह आयुक्त, पोलीस अधीक्षकांना 25 नोव्हेंबर रोजी दिली असून, याबाबतचे पत्रक सुध्दा प्रसिध्द केले आहे.
वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने, रस्ता सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण ही वाढले. या अपघातात दुचाकी वाहनचालकांची बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वाराने वाहतूकीचे नियम पाळत, स्वत: आणि आपल्या सोबत दुचाकीच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करीत हेल्मेटचा वापर करावा. अन्यथा हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वाराबरोबर दुचाकीच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीविरोधी वाहतुक पोलिसांच्याकडून कारवाई करण्यात येत होती. या कारवाईबाबतची माहिती ई चालान मशिनमध्ये एकाच नावाखाली मिळत होती. त्यामुळे राज्याच्या गृह विभागाला हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्याची आणि त्यांच्या पाठीमागे ही विना हेल्मेट बसणाऱ्यांची स्वतंत्र अशी अचुक माहिती मिळत नव्हती. याची दखल घेवून राज्याच्या गृह विभागाने ई चालान मशिनमध्ये मोठा बद्दल केला आहे.
या बद्दलामुळे पोलिसांच्याकडून विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्याविरोधी केलेल्या कारवाईची वेगवेगळी माहिती आणि त्यांच्या पाठीमागे ही हेल्मेट न वापरता बसणाऱ्याविरोधी केलेल्या कारवाईची वेगळी माहिती राज्याच्या गृह विभागाला मिळणार आहे. त्याचबरोबर ई चालान मशिनमधील बदलामुळे आता पोलिसांना हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारवर वेगळी कारवाई आणि त्यांच्या पाठीमागे हेल्मेट विना बसलेल्या व्यक्तीवर अशा वेगवेगळ्या कारवाई करावी लागणार आहे.