महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आगारप्रमुखांच्या मनमानीमुळे चिखले बसच्या वेळेत बदल

09:08 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॉलेज, विद्यार्थ्यांचे अतोनात हाल :  दुपारी 2 वाजता सुटणाऱ्या बसच्या वेळेचा फज्जा, विद्यार्थ्यांमध्ये संताप

Advertisement

वार्ताहर /कणकुंबी

Advertisement

खानापूर आगाराच्या बेळगावहून दुपारी 2 वाजता सुटणाऱ्या चिखले बसच्या वेळापत्रकात अचानकपणे बदल करण्यात आल्याने जांबोटी भागातून बेळगावला महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून अतोनात हाल होत आहेत. खानापूर आगारातून बेळगाव-चिखले अशी सकाळ, दुपार व मुक्काम अशी दिवसांतून तीनवेळा बससेवा आहे. यापैकी बेळगावहून दुपारी 2 वाजता सुटणाऱ्या चिखले बसला दररोज वीस ते पंचवीस महाविद्यालयाचे विद्यार्थी असतात. जांबोटीहून सकाळी 7 वाजता बेळगावच्या आरपीडी, जीएसएस, पंडीत नेहरू व इतर महाविद्यालयाला जाणारे विद्यार्थी दुपारच्या चिखले बसणे घरी येतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून सदर बसच्या वेळापत्रकात खानापूर आगारप्रमुखांनी अचानकपणे बदल केल्याने विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट उडत आहे.

बिनभरवशाचे वेळापत्रक

गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून सदर बस कधी तीन वाजता, कधी साडेतीन तर कधी चार वाजता बस सोडत असल्याने विद्यार्थ्यांना दीड-दोन तास स्टँडवर ताटकळत बसावे लागत आहे. काहीवेळा दोन-तीन तास बसूनही बसचा भरवसा नाही. कधीकधी ही बस रद्द करण्यात येते. यासंदर्भात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बसचालक आणि वाहकांना विचारले असता आम्ही काही करू शकत नाही. आमच्या आगारप्रमुखांना विचारा, असे सांगितले जाते.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकमेव चिखले बस

जांबोटी परिसरातील कालमणी, आमटे, जांबोटी, हब्बनहट्टी, ओलमणी, कुसमळी, सोनारवाडी व उचवडे आदी गावांतील जवळपास वीस ते पंचवीस विद्यार्थी या चिखले बसने प्रवास करतात. बेळगाव, चोर्ला, पणजी मार्गावरून कर्नाटक व गोव्याच्या अनेक बसेस धावतात. परंतु या बसमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. बसपास असल्याने केवळ लोकल (स्थानिक) बसनेच प्रवास करावा लागतो. परंतु सदर एकमेव असलेली चिखले बसदेखील आता विद्यार्थ्यांना बिनभरवशाची झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बससेवा सुरळीत करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा

सकाळी 7 वाजता गेलेले विद्यार्थी चिखले बसच्या अनियमितपणामुळे संध्याकाळी पाच ते सहा वाजता घरी पोहोचत आहेत. चिखले बसच्या अनियमितपणाबद्दल खानापूर आगारप्रमुखांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आगारप्रमुखांनी जाणीवपूर्वक संपर्क टाळलेला आहे. एकंदरीत खानापूर आगारप्रमुखांच्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील अनेक मार्गावरील बससेवा विस्कळीत झालेली आहे. आगार व्यवस्थापकांनी त्वरित बससेवा सुरळीत करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन हाती घ्यावे लागेल, असा इशारा महाविद्यालायीन विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article