दुसऱ्या कसोटी स्थानामध्ये बदल
06:00 AM Aug 19, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ लाहोर
Advertisement
बांगलादेशचा क्रिकेट संघ पाकमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आल्याची घोषणा पीसीबीने रविवारी केली आहे.
Advertisement
यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी रावळपिंडीत 21 ऑगस्टपासून खेळवली जाईल. त्यानंतर उभय संघातील 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे. ही कसोटी आता कराची ऐवजी रावळपिंडीत होणार आहे. कराचीमधील नॅशनल स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने हा बदल करण्यात आला आहे. पुढील वर्षी पाकमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी कराचीच्या नॅशनल स्टेडियमचे नूतनीकरण पीसीबीने हाती घेतले आहे. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा 19 फेब्रुवारी 2025 रोजी सुरु होणार आहे.
Advertisement
Next Article