चंदुकाका सराफ ज्वेल्सची स्वातंत्र्यदिनानिमित्त दागिने खरेदीवर विशेष ऑफर
पारंपरिक सौंदर्याला स्वातंत्र्याची झळाळी!
बेळगाव : स्वातंत्र्यदिन म्हणजे गौरवशाली आठवणींना सोनेरी झळाळी देत आपली परंपरा आणि संस्कृतीचा वारसा अविरत सुरू ठेवणे. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. या दिवशी भारत ब्रिटिश सत्तेपासून मुक्तता मिळवून एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगासमोर भक्कमपणे उभा राहिला. हा दिवस केवळ इतिहास नव्हे, तर प्रेरणा आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, त्याग आणि देशभक्तीचे सर्वोच्च मूल्य जपणे आपले आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच यंदा 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोनेरी उत्सवानिमित्त चंदुकाका सराफ ज्वेल्स खास ऑफर्स घेऊन आले आहेत.
या स्वातंत्र्यदिनी तिरंग्याच्या अभिमानात आणि तुमच्या झळाळत्या सौंदर्यात नव्या दागिन्यांचं तेज पडणार आहे. सन् 1827 पासून गुणवत्ता आणि शुद्धतेचा वारसा जपणाऱ्या चंदुकाका सराफ ज्वेल्सने परंपरा आणि नाविन्यतेचा संगम घालून स्वातंत्र्यदिनानिमित्त स्पेशल ऑफर्स आणल्या आहेत. सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 20 टक्के सूट तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 50 टक्के सूट मिळणार आहे. सदरची ऑफर गोल्ड आणि डायमंड दागिन्यांच्या खरेदीवर दि. 14 ते 24 ऑगस्टपर्यंत असणार आहे. यासोबतच प्रत्येक दागिन्यांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तूही मिळणार आहेत.
पुण्यातील रविवार पेठ, चिंचवड, भोसरी, सातारा रोड, कोथरूड, वाकड, चऱ्होली या शाखांमध्ये, याशिवाय महाराष्ट्रातील सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर व नव्याने सुरू झालेल्या वाई तसेच कर्नाटकातील अथणी, गोकाक, बेळगाव आणि रबकवी या शाखांमध्येसुद्धा स्वातंत्र्याच्या सोनेरी उत्सवानिमित्त खास ऑफर्ससह सुंदर दागिन्यांच्या खरेदीचा आनंद ग्राहकांना घेता येणार आहे. म्हणून या संधीचे सोने करा, असे आवाहन चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या माध्यमातून करण्यात आले आहे.