चंदुकाका सराफ ज्वेल्सतर्फे आता ‘बनारस’ अन् ‘बॅलरिना’ कलेक्शन्स सादर
बेळगाव : 1827 पासून विश्वास, गुणवत्ता आणि ग्राहकांशी असलेले अतूट नाते जपणारे चंदुकाका सराफ ज्वेल्स आता भारतीय परंपरा आणि बॅले नृत्याच्या जागतिक डिझाईनचा सुंदर आणि अभूतपूर्व संगम असलेल्या ‘बनारस‘ आणि ‘बॅलरिना‘ कलेक्शनची पर्वणी घेऊन आले आहेत. भारतीय वारसा, कलात्मकता आणि आधुनिकतेचा अद्वितीय मेळ साधणारी या कलेक्शन्सची संकल्पना भारतीय ज्वेलरी उद्योगासाठी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आणि अभिमानास्पद ठरणारी आहे.भारतात प्रथमच दोन भिन्न संकल्पनांवर आधारित डायमंड ज्वेलरी कलेक्शन्सचे एकत्रित भव्य लोकार्पण होत आहे.
40 बनारसी कारागिर कुटुंबांच्या हातातून निर्माण झालेली दुर्मीळ गुलाबी मीनाकारी या कलेक्शनद्वारे पुनर्जीवित होत आहे. भारतीय परंपरेचा वारसा जपत स्थानिक कारागिरांच्या कलेला जागतिक पातळीवर नेणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. बनारस कलेक्शनची वैशिष्ट्यो : शतकानुशतके जुनी गुलाबी मीनाकारी परंपरा, सौंदर्य आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक. नामशेष होत चाललेल्या या कलेला चंदुकाका सराफ ज्वेल्सने पहिल्यांदाच डायमंड ज्वेलरीत पुनर्जीवित केले. पिढ्यानपिढ्या जपावा असा कालातीत हेरलूम परंपरा व आधुनिकतेचा अनोखा मिलाफ. संपूर्ण भारतात फक्त 30-40 बनारसी कारागिर कुटुंबे ही शुद्ध कला आजही जिवंत ठेवतात.
बॅलरिना कलेक्शनची वैशिष्ट्यो : बॅले नृत्याच्या एलिगन्स, परफेक्शन आणि हार्मनीपासून प्रेरित अद्वितीय डायमंड कलेक्शन. नृत्याच्या लवचिक हालचाली व फोल्ड्स प्रत्येक डिझाईनमध्ये नाजूकपणे प्रतिबिंबित. शिल्पाकृती फोल्ड्समध्ये बसवलेला चमकदार पिंक सॅफायर आणि त्याला पूरक डायमंड्स. अत्यंत नाजूक कारागिरीने घडवलेले लिमिटेड एडिशन, संग्रहणीय आधुनिक डिझाईन्स, पारंपरिक दागिने आणि गुणवत्तेची हमी जपत गुलाबी मीनाकारीच्या या नवीन एक्सक्लुसिव्ह कलेक्शन्सची खरेदी करण्याचा आनंद ग्राहकांना मिळणार आहे.
पुण्यातील रविवार पेठ, चिंचवड, भोसरी, सातारा रोड, कोथरूड, वाकड, चऱ्होली, बाणेर. महाराष्ट्रातील सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, वाई, नांदेड, छत्रपती संभाजीनगर व बेळगावी या सर्व शाखांमध्ये ‘बनारस‘ व ‘बॅलरिना‘ कलेक्शन्स उपलब्ध आहेत. चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या जवळच्या शाखेला भेट देण्याचे आवाहन हे कलेक्शन्स अत्यंत मर्यादित संख्येत उपलब्ध असल्याने, प्रत्येक पीस हा हस्तकौशल्य, डिझाईन सौंदर्य आणि आधुनिक एलिगन्सचा एकमेव उत्कृष्ट नमुना आहे. आपल्या आवडीचे ‘बनारस‘ आणि ‘बॅलरिना‘ या खास कलेक्शनच्या खरेदीचा आनंद घेण्यासाठी चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या जवळच्या शाखेला भेट द्या.