चंदुकाका सराफ ज्वेल्सतर्फे मेगा ड्रॉचा भाग्यवान विजेता जाहीर
सांगलीच्या नूतन माने ठरल्या दोन बीएचके फ्लॅटच्या मानकरी
बेळगाव : सुवर्ण खरेदीच्या परंपरेला पुढे चालविण्यासाठी गेल्या 200 वर्षांपासून शुद्धतेचा वारसा जपणारे चंदुकाका सराफ ज्वेल्स नेहमी आपल्यासाठी आकर्षक ऑफर्स घेऊन येतात. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आयोजित केलेल्या ‘ग्रँड फेस्टिव्ह ऑफर’सह दोन बीएचके फ्लॅट जिंकण्याची सुवर्णसंधी यावेळी ग्राहकांना देण्यात आली होती. मेगा ड्रॉच्या माध्यमातून दोन बीएचके फ्लॅटच्या भाग्यवान विजेत्याची घोषणा करण्यात आली. चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या सॉलिटेअर बिझनेस हब 2, बालेवाडी हाय स्ट्रीट, बाणेर येथे मेगा ड्रॉ चा कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी सांगली येथील नूतन संदीप माने दोन बीएचके फ्लॅटच्या विजेत्या ठरल्या.
बक्षिसांची केवळ घोषणा न करता सदर बक्षिसे प्रत्यक्षात ग्राहकांना प्रदान करण्याची परंपरा चंदुकाका सराफ ज्वेल्स यांनी जपली आहे. चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या सांगली शाखेमध्ये झालेल्या कार्यक्रमात नूतन संदीप माने यांना फ्लॅटच्या किल्ल्या चंदुकाका सराफ ज्वेल्स्?ाच्या संचालिका संगीता अतुल शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. यावेळी जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा माधुरी श्रीकांत चौगुले, चंदुकाका सराफ ज्वेल्स्?ाचे सेल्स हेड प्रभात मेहंदीरत्ता, क्लस्टर मॅनेजर व कर्मचारी वृंद उपस्थित होते. तब्बल 200 वर्षांपासून सोन्याची शुद्धता आणि परंपरेचा वारसा जपणारे चंदुकाका सराफ ज्वेल्स, ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक आणि प्रत्येक उत्सवाचा खरा सोबती म्हणून आपली परंपरा आणि बांधिलकी जपत आहेत.