For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवसेना उबाठा गटाचे चंद्रकांत गोलतकर यांचा शिंदे गटात प्रवेश

12:24 PM Dec 17, 2023 IST | अनुजा कुडतरकर
शिवसेना उबाठा गटाचे चंद्रकांत गोलतकर यांचा शिंदे गटात प्रवेश
Advertisement

आचरा | प्रतिनिधी

Advertisement

महाराष्ट्रमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद वाढत असून मालवण तालुक्यातील पळसंब गावचे माजी सरपंच तथा उबाठा शिवसेना गटाचे विभाग संघटक चंद्रकांत गोलतकर यांनी काल महाराष्ट्रचे उद्योगमंत्री रत्नागिरी -रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेवून आज किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

चंद्रकांत गोलतकर यांच्या प्रवेशामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या समवेत उबाठा गटाचे कार्यकर्ते भरत किरूळकर यांनीही जाहीर प्रवेश केला. गावाच्या आणि परिसरातील गावाचा विकासासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते जावे लागण्याचे चंद्रकांत गोलतकर म्हणाले. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एकनिष्ठ पदाधिकारी राहिलो पक्ष वाढवण्यासाठी खूप कष्ट केले मात्र विकासासाठी मागे राहिलो. त्यामुळे मला आज प्रवेश करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.रत्नागिरीच्या किंगमेकर यांनी रत्नागिरीतुन सूत्र हलवून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मालवणात जोरदार धक्का दिला असून मालवण तालुक्यात मोठा राजकीय भूकंप करणार असल्याचे किरण सामंत यांनी सांगितले. या प्रवेशा दरम्यान शिवसेना उपजिल्हा प्रमुख शेखर राणे, तालुका प्रमुख महेश राणे, सतीश आचरेकर, युवा उद्योजक सिद्धेश ब्रीद, अजु भोंगले उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.