महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री

06:48 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पवन कल्याण उपमुख्यमंत्री : टीडीपीच्या 20, जनसेनेच्या 3, भाजपच्या एका मंत्र्याने घेतली शपथ

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

टीडीपीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून ही त्यांची चौथी टर्म आहे. तसेच ते राज्याच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री बनणारे नेतेही बनले आहेत. चंद्राबाबू यांच्यासमवेत जनसेना प्रमुख आणि अभिनेते पवन कल्याण यांनी नायडू मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. नायडू सरकारमध्ये पवन कल्याण उपमुख्यमंत्री होणार आहेत. तसेच चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर आंध्रप्रदेशातही एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) सुप्रीमो चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी राज्याचे 24 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. नायडू यांनी आपल्या पुत्रालाही मंत्रिमंडळात सामावून घेतले आहे. प्रादेशिक पक्ष म्हणून नायडूंच्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यांच्या नेतृत्वाखाली लोकेश यांना पक्ष तसेच सरकार चालवण्याचे बारकावे समजतील.

वडील मुख्यमंत्री, मुलगा मंत्री

याआधी अलीकडचा राजकीय इतिहास पाहिला तर पंजाबमध्ये अकाली दलाची सत्ता असताना त्यांचे नेते आणि मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी त्यांचा मुलगा सुखबीर सिंग बादल यांना उपमुख्यमंत्री बनवले होते. तसेच 2006 ते 2011 पर्यंत तामिळनाडूत द्रमुकची सत्ता असताना एम कऊणानिधी मुख्यमंत्री होते. त्या काळात त्यांचा मुलगा स्टॅलिन हा त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी होता. तसेच महाराष्ट्रात उद्धव-आदित्य ठाकरे हे पिता-पुत्रही बहुचर्चित राहिले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article