For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंदीगडचा महाराष्ट्रवर विजय

06:21 AM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
चंदीगडचा महाराष्ट्रवर विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

सय्यद मुश्ताक अली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ब गटातील रविवारी येथे झालेल्या सामन्यात मनन वोहराच्या अर्धशतकाच्या जोरावर चंदीगडने महाराष्ट्रचा 5 गड्यांनी पराभव केला.

या सामन्यात चंदीगडने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजी दिली. महाराष्ट्राने 20 षटकात 7 बाद 139 धावा जमविल्या. त्यानंतर चंदीगडने 19.4 षटकात 5 बाद 142 धावा जमवित हा सामना 5 गड्यांनी जिंकला. महाराष्ट्राच्या डावामध्ये अर्शिन कुलकर्णीने 41 चेंडूत 47, निखिल नाईकने 24 तर ओसवालने 28 धावा केल्या. चंदीगडतर्फे संदीप शर्माने 18 धावांत 2 गडी बाद केले. त्यानंतर चंदीगडच्या डावामध्ये मनन वोहराने 48 चेंडूत 72 धावांची खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने 2 षटकार आणि 9 चौकार ठोकले. वोहरा आणि निखिल ठाकुर यांनी चौथ्या गड्यासाठी 55 धावांची भागिदारी केली. ठाकुरने 36 धावा जमविल्या.

Advertisement

संक्षिप्त धावफलक-महाराष्ट्र 20 षटकात 7 बाद 139, चंदीगड 19.4 षटकात 5 बाद 142 (मनन वोहरा 72).

Advertisement
Tags :

.