कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चंदिगड विद्यापीठाने सर्वंकष जेतेपद राखले

06:46 AM Dec 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स : श्रीहरी नटराज, धिनिधी ठरले सर्वात यशस्वी खेळाडू 

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

Advertisement

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी क्रीडा स्पर्धेत चंदिगड युनिव्हर्सिटीने सर्वंकष चॅम्पियनशिप स्वत:कडेच राखताना स्पर्धेत 42 सुवर्ण, 14 रौप्य, 11 कांस्यपदकांसह एकूण 67 पदके पटकावली. ऑलिम्पियन व भारताचा अव्वल जलतरणपटू श्रीहरी नटराज हा या स्पर्धेतील सर्वांत यशस्वी खेळाडू ठरला. त्याने 9 सुवर्ण, 2 रौप्यपदके मिळविली तर 9 सुवर्णपदके मिळविणारी 14 वर्षीय धिनिधी देशिंघू सर्वात यशस्वी महिला अॅथलीट ठरली.

श्रीहरीच्या या कामगिरीमुळे बेंगळूर जैन विद्यापीठाला एकूण 27 सुवर्ण, 9 रौप्य व 9 कांस्यपदके मिळविता आली. चंदिगड विद्यापीठाने कॅनो व कायकिंगमध्ये 30 पैकी 23 सुवर्णपदके मिळविली. हा क्रीडा प्रकार पहिल्यांदाच यावेळी घेण्यात आला. यापैकी 6 जलतरणमध्ये, 5 अॅथलेटिक्समध्ये, 2 कुस्तीमध्ये आणि वेटलिफ्टिंग, नेमबाजी, सायकलिंग, तिरंदाजी, टेबल टेनिस, कब•ाr यामध्ये एकेक सुवर्ण मिळविले.

लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाने (एलपीयू) 78 पदकांसह सर्वंकष चॅम्पियनशिपमध्ये दुसरे स्थान मिळविले. त्यांनी चंदिगडपेक्षा 11 जास्त पदके मिळविली असली तरी सुवर्णपदके कमी होती. त्यांनी 32 सुवर्ण, 25 रौप्य व 22 कांस्यपदके मिळविली. गुरूनानक देव विद्यापीठाने 32 सुवर्णपदके पटकावली. मात्र 22 रौप्य व 18 कांस्यपदके मिळविली असल्याने त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या या पाचव्या आवृत्तीतील खेळ राजस्थानमधील सात विविध शहरात घेण्यात आले. 12 दिवस चाललेल्या या स्पर्धेत 23 क्रीडाप्रकारांत 222 विद्यापीठातील 4448 अॅथलीट्सनी भाग घेतला होता. पूर्णिमा विद्यापीठाने साइच्या विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये एकूण 12 नवे स्पर्धाविक्रम नोंदवले गेले, त्यात दोन ऑल इंडिया युनिव्हर्सिटी विक्रमांचाही समावेश होता.

शेवटच्या दिवशी एकूण 28 सुवर्णपदके होती, त्यापैकी 24 मुष्टियुद्धसाठी होती. लव्हली प्रोफेशनल व गुरू नानकदेव यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी चुरस लागली होती. लव्हली प्रोफेशनलने बॉक्सिंगमध्ये 2 व कब•ाrमध्ये एक सुवर्ण जिंकत त्यात बाजी मारली. गुरू काशी विद्यापीठाने बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक पदके जिंकत आघाडी मिळविली. त्याने 4 सुवर्ण, 3 रौप्य व 5 कांस्यपदके मिळवित एकंदर 15 सुवर्ण, 15 रौप्य, 18 कांस्यपदकांसह क्रमवारीत पाचवे स्थान मिळविले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article